Corona Patient Sakal
पुणे

पुणे : एकूण सक्रिय (ॲक्टिव्ह) कोरोना रुग्णांची संख्या ९,००० खाली; ७ जणांचा मृत्यू

पुणे शहरातील एकूण सक्रिय (ॲक्टिव्ह) कोरोना रुग्णांची संख्या नऊ हजारांच्या खाली आली आहे. सध्या शहरात ८ हजार ९८८ सक्रिय रुग्ण आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहरातील एकूण सक्रिय (ॲक्टिव्ह) कोरोना रुग्णांची संख्या नऊ हजारांच्या खाली आली आहे. सध्या शहरात ८ हजार ९८८ सक्रिय रुग्ण आहेत.

पुणे - पुणे शहरातील (Pune City) एकूण सक्रिय (ॲक्टिव्ह) कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या नऊ हजारांच्या खाली आली आहे. सध्या शहरात ८ हजार ९८८ सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी (ता.११) दिवसभरात एक हजार ३६३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. याउलट दिवसभरात ४ हजार २३८ जण कोरोनामुक्त (Coronafree) झाले आहेत.

शुक्रवारी दिवसभरात सात जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गुरूवारच्या (ता.१०) तुलनेत शुक्रवारी (ता.११) कोरोना रुग्णांचे मृत्यू सहाने कमी झाले आहेत. गुरुवारी मृत्यूची संख्या १३ इतकी होती. दिवसातील जिल्ह्यातील एकूण मृत्यूमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी दोन आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एक मृत्यू आहे. दिवसभरात नगरपालिका हद्दीत एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यातील दिवसातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ७०० रुग्ण आहेत. दिवसात पिंपरी चिंचवडमध्ये ३३५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २५९, नगरपालिका हद्दीत ४३ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात २६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरातील एकूण कोरोनामुक्तांमध्येही पुणे शहरातील सर्वाधिक २ हजार १९७ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील १ हजार १७७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६७१, नगरपालिका हद्दीतील १३५ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ५८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारी १५ हजार ९६० झाली आहे. एकूण सक्रिय रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये मिळून १ हजार २७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उर्वरित १४ हजार ६८४ जण गृह विलगीकरणात आहेत. दिवसभरात १५ हजार ९७४ जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने रोज कोरोना आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध केला जातो. या अहवालातून हे उघड झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "देश ज्ञानेश कुमारांच्या बापाचा आहे का?" उद्धव ठाकरे कडाडले; केंद्र सरकारवरही बोचरी टीका

Maharashtra MLC Election 2026 : भाजपची मोठी घोषणा! विधान परिषद निवडणुकीसाठी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचे उमेदवार जाहीर; पाहा संपूर्ण यादी

Latest Marathi News Live Update : CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

Masarul Dam Water: अवैध उपशामुळे धरणाच्या पाणीसाठ्यावर संकट;मासरूळ धरणातील उपशावर कारवाईची मागणी

Kikvi Project Deal : किकवी प्रकल्प व्यवहाराच्या कोणत्याही चौकशीस तयार माजी संचालकांचा खुलासा; करार पारदर्शी

SCROLL FOR NEXT