Students_Online_Education 
पुणे

आता शाळा बंद आंदोलन; पुणे, पिंपरी-चिंचवडमधील शाळांचे ३ दिवस ऑनलाइन शिक्षण बंद

ब्रिजमोहन पाटील

पुणे : 'कोरोना' काळात शाळांनी शुल्क वसुली करू नये म्हणून पालक आंदोलन करत आहेत. मात्र, आता पैसे नसल्यामुळे आम्हाला शाळा सुरू ठेवणे शक्‍य नाही, शिक्षकांचे पगार, कर्जाचे हप्तेही फेडणे अशक्‍य झाले असे सांगत पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील चौदाशे शाळांनी मंगळवारपासून (ता. 15) तीन दिवस ऑनलाइन शिक्षण बंद करून आंदोलन करण्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारने याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करत असल्याचे फेडरेशन ऑफ स्कूल्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र या संघटनेने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

ऑनलाइन शाळा सुरू झाल्यापासून शुल्क वसुलीचा मुद्दा ज्वलंत झाला आहे. प्रत्यक्षात शाळा नसताना देखील शाळा सरसकट शुल्क मागत आहेत, शुल्क न भरल्याने ऑनलाइन शिक्षण बंद केले अशा तक्रारी शिक्षण विभागाकडे करण्यात आल्या आहेत. त्यावर शिक्षण विभागाने "कोरोना'मुळे अनेक पालकांचे रोजगार गेल्याने शाळांनी शुल्क वसुलीसाठी तगादा लावू नये,असे परिपत्रक काढले आहे. याबाबत आज फेडरेशन ऑफ स्कूल्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र संघटनेने पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट करत केली. यावेळी अध्यक्ष राजेंद्र सिंह, कार्याध्यक्ष जागृती धर्माधिकारी सचिव ओम शर्मा, मिलिंद घाडगे आदी उपस्थित होते.

राजेंद्र सिंह म्हणाले, स्कूलबस, जेवण, कॉम्प्युटर लॅब, जिमखाना आदी सुविधांचे शुल्क आम्ही यावर्षी घेतले नाही. कमी केलेले शुल्क भरण्यासाठी पालकांना त्यांच्या सोईनुसार हप्ते भरण्याची मुभा दिली. आत्तापर्यंत केवळ 30 टक्के पालकांनी शुल्क भरले आहे. 50 टक्के पालकांनी शुल्क भरलेले नाही. तर 20 टक्के पालकांनी शुल्क भरण्याबाबत अडचण असल्याचे शाळांना कळवले आहे. अनेक पालकांची शुल्क भरण्याची क्षमता असून देखील त्यांनी शुल्क भरले नाही, असा आरोप सिंह यांनी केला.

ज्या पालकांनी शुल्क भरले आहे त्यावर शिक्षकांचे पगार, शाळेच्या जागेचे भाडे, बॅंकेचे हप्ते देणे शक्‍य नाही. त्यामुळे शाळांना ऑनलाइन शिक्षणही बंद करावे लागणार आहे. शासनाने यातून तोडगा काढून दिलासा द्यावा या मागणीसाठी व पालकांनी शाळांची बाजू समजून घ्यावी; याकडे लक्ष वेधण्यासाठी 15 ते 17 डिसेंबर दरम्यान ऑनलाइन शाळा बंद ठेवून आंदोलन केले जाणार आहे, असे सिंह यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel Iran War : युद्ध आणखीनच पेटले ! इस्त्रायलच्या हल्ल्यात इराणचे नवे संरक्षणमंत्रीही ठार, तेहरानमध्ये विध्वंस

Holi and Bhang Connection: होळीला प्यायली जाणारी भांग कायदेशीर असते का? वाचा कशी पडली परंपरा आणि पौराणिक कथा

IPL 2026 Schedule : गतविजेता RCB पहिल्याच सामन्यात MI किंवा CSK ला भिडणार? BCCI ने वेळापत्रकाबाबत दिले महत्त्वाचे अपडेट्स

Nashik Municipal Corporation : मनपाचा धडक 'सर्जिकल स्ट्राईक'; उंटवाडीतील गॅस रिफिलिंग अड्ड्यावर छापा, ५० सिलेंडर्स जप्त

Nashik Road Development : नाशिकच्या रस्त्यांचे भाग्य उजळणार: मनपा देणार 'बांधकाम टीडीआर', ३१ प्रभागांसाठी १४४ कोटींचा निधी!

SCROLL FOR NEXT