Fine-Recovery
Fine-Recovery 
पुणे

दीड कोटीचा दंड वसूल

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिस करत आहेत. मात्र, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. जानेवारी ते २४ डिसेंबरदरम्यान वाहतूक पोलिसांनी एक कोटी ५४ लाख ५० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. कारवाईच्या सर्वाधिक केसेस मे महिन्यामध्ये, तर सर्वांत कमी तक्रारी सप्टेंबरमध्ये दाखल झाल्या आहेत. 

आयटी पार्कमुळे दररोज ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या दोन लाखांच्या पुढे आहे. सिग्नल तोडणे, चुकीच्या दिशेने वाहन चालवणे, हेल्मेट न घालणे, परवाना न बाळगणे आदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे आयटी पार्कमधील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी शिवाजी चौकामध्ये राबविलेला चक्राकार वाहतुकीचा प्रयोग यशस्वी झाला आहे.

वाहतूक पोलिसांकडून कंपन्यांमध्ये कार्यक्रम 
आयटी कर्मचाऱ्यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे, म्हणून वाहतूक पोलिसांकडून या परिसरातील कंपन्यांमध्ये जाऊन प्रबोधन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. कंपन्या आणि कर्मचारी वर्गाकडून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असतो. चालकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत यासाठी हा प्रयत्न आहे.

पार्किंगची समस्या...
आयटी पार्कच्या परिसरात पार्किंगची समस्या निर्माण होऊ लागली आहे. फेज टूमधील विप्रो कंपनीजवळच्या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात दुचाकी, मोटारींचे पार्किंग होत असते. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शिवाजी चौकालगत असणाऱ्या सिग्नलजवळदेखील अशीच परिस्थिती आहे. येथे रस्त्यालगत वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा होतो. एमआयडीसीने या प्रश्‍नांमध्ये लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू असते. आयटी पार्कमुळे या परिसरात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नियम तोडणाऱ्या चालकांवर सातत्याने कारवाई करावी लागते. 
- किशोर म्हसवडे, वाहतूक पोलिस निरीक्षक, हिंजवडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT