kondhava 
पुणे

Pune Wall Collapse : पहाटेच्या साखर झोपेतच त्यांना मृत्यूने गाठले!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : हाताला काम, पोटाला भाकरी आणि राहायला आसरा मिळेल, म्हणून त्यांनी लेकराबाळांसह बिहारमधून पुणे गाठले. एका बांधकाम प्रकल्पावर ते काम करीत होते. तिथेच एका संरक्षक भिंतीच्या आधाराने झोपडीत राहू लागले. नेहमीप्रमाणे शुक्रवारी त्यांनी काबाडकष्ठ केले, रात्री जेवले, एकत्र गप्पागोष्टी केल्या आणि झोपले. झोपेतच ज्या भिंतीने आधार दिला, तीच भिंत भल्या पहाटे त्यांच्या संसारावर कोसळली आणि बघता-बघता 15 जणांना मृत्युने साखरझोपेत गाठले.

बिहारमधील वेगवेगळ्या जिल्हातील कटीयार, कोंडीयाल छोट्या-छोट्या खेडयातून पोट भरण्यासाठी अनेक मजूर पुण्यासह मुंबई व अन्य शहरात दाखल होतात. त्याप्रमाणेच कटीयार जिल्हातील शर्मा, सिंह, देवी अशी वेगवेगळी कुटुंबे आपल्या कुटुंब कबिल्यासह पुण्यातील कोंढवा परीसरात दाखल झाली. एका बांधकाम प्रकल्पवर काही दिवसांपासून काम करु लागले.

दरम्यान, बांधकाम व्यावसायिकाने मजुरांना राहण्यासाठी शेजारीच असलेल्या एका सोसायटीच्या संरक्षक भिंतीजवळ "ट्रांझिट  कॅम्प"च्या झोपड्या थाटल्या. याच झोपड्यात कामगार व त्यांचे कुटुंब गेल्या काही दिवसांपासून वास्तव्य करीत होते. शुक्रवारी दिवसभर काम सूरु असतानाही कामगारांनी इमारतीमध्ये काम केले. त्यानंतर सर्वजण सायंकाळी काम संपल्यानंतर नेहमीप्रमाणे एकत्र गप्पागोष्टी करीत होते. महिलांनी जेवण बनवून सर्वांनी जेवण केले. काही वेळ मुलांसमवेत खेळले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काम करण्यासाठी लवकर उठण्यासाठी सर्वजण झोपी गेले. 

सगळेजण पहाटेच्या साखरझोपेत असतानाचा ज्या भिंतीच्या आधाराने त्यांचे संसार फुलू लागले होते, त्याच भिंतीने घात केला. ती भिंत त्यांच्या झोपडयावर कोसळली. त्यामध्ये 16 कामगार, त्यांच्या बायका-मुलांचाही मृत्यू झाला.

मृतांची अधिकृत यादी : 
1) आलोक शर्मा - 28 वर्षे 
2) मोहन शर्मा - 24 वर्षे 
3) अमन शर्मा - 19 वर्षे 
4) अजितकुमार शर्मा - 7 वर्षे 
5) रवि शर्मा -19 वर्षे 
6) लक्ष्मीकांत सहानी - 33 वर्षे 
7) अवदेश सिंह - 32 वर्षे 
8) सुनील सिंग - 35 वर्षे 
9) ओवी दास - 2 वर्षे  
10) सोनाली दास - 6 वर्षे  
11) भिमा दास - 28 वर्षे 
12) संगीता देवी - 26 वर्षे 
13) रावलकुमार शर्मा - 5 वर्षे 
14) निवा देवी - 30 वर्षे 
15) दिपरंजन शर्मा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT