रमाई आवास योजन 
पुणे

पंतप्रधान आवास योजनेतून पुण्यात १५,००० घरे

‘पीपीपी’ तत्त्वावर बांधकाम; फुरसुंगी, लोहगावमधील जागेची मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पंतप्रधान आवास योजनेतील घरे निविदा काढून बांधण्याऐवजी ‘पीपीपी’ तत्त्वावर (पब्लिक, प्रायव्हेट, पार्टनरशिप) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार शहरात पंधरा हजार घरे बांधण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठी फुरसुंगी आणि लोहगाव येथील सुमारे चाळीस एकर गायरान जागेची मागणी महापालिकेने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

महापालिकेने या योजनेतंर्गत पहिल्या टप्प्यात खराडी, सिंहगड रस्त्यावरील वडगाव आणि हडपसर येथे २९१८ घरे बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा काढून हे काम दिले आहे. त्यामुळे बांधकाम व्यावसायिक आणि लाभार्थी यांच्यामध्ये महापालिकेला मध्यस्थीची भूमिका राबवावी लागत आहे. तसेच महापालिकेला त्यासाठी निधी देखील उपलब्ध करून द्यावा लागत आहे. त्यामुळे योजना राबविताना अनेक अडथळे येत आहेत.

दरम्यान ही योजना पीपीपी मॉडेलच्या माध्यमातून राबविण्यासही मध्यंतरी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्यामुळे महापालिकेने या मॉडेलचा वापर करून शहरात पंधरा हजार घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महापालिकेच्या ताब्यात आलेल्या बाणेर-बालेवाडी भागातील दहा एकर जागा, तर फुरसुंगी आणि लोहगाव येथील चाळीस एकर जागा अशी सुमारे ५० एकर जागेवर १५ हजार घरे बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी फुरसुंगी आणि लोहगाव येथील गायरान जागेची मागणी महापालिकेने केली आहे.

  • या येाजनेसाठी महापालिकेकडून २० हजार लाभार्थ्यांची यादी चार वर्षांपूर्वीच निश्‍चित करण्यात आली आहे

    त्यापैकी सुमारे ३ हजार घरांचे बांधकाम महापालिकेने निविदा काढून दिले आहे

  • आता पंधरा हजार घरे बांधण्याचे काम पीपीपी तत्त्वावर निविदा मागवून देण्यात येणार आहे

  • पीपीपी तत्त्वावर महापालिका केवळ विकसक यांना जागा उपलब्ध करून देणार आहे

  • त्यासाठी निविदा काढून जो कमी दरात आणि सर्वाधिक सदनिका उपलब्ध करून देईल, त्यांनाच काम देणार

  • म्हाडा ज्या दरात सदनिका उपलब्ध करून देते, त्याच दराने संबंधित विकसकाने महापालिकेने निश्‍चित केलेल्या लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करून देण्याचे बंधन राहणार आहे.

''पंतप्रधान आवास योजनेमध्ये गायरान जागा वापरण्यास केंद्राने परवानगी दिली आहे. त्यामुळे फुरसुंगी आणि लोहगाव येथील गायरान जागेची मागणी महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे. त्यांच्याकडून तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. पीपीपी या तत्त्वावर घरे बांधण्यात येणार आहे.''

- युवराज देशमुख, अधिक्षक अभियंता, बांधकाम विकसक, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS : पथूम निसंका पहिला शतकवीर! श्रीलंका Super 8s मध्ये, ऑस्ट्रेलियाचे नशीब 'आयर्लंड'च्या हाती; जाणून घ्या समीकरण

Surya Grahan 2026: वर्षातील पहिले सूर्यग्रहण 'या' 3 राशींसाठी ठरु शकते धोकादायक, 'हे' उपाय करा नाहीतर होईल मोठी हानी!

Muhammad Yunus Resigns : मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या मुख्य सल्लागारपदाचा दिला राजीनामा!

Mani Shankar Aiyar : ‘’मी गांधीवादी, नेहरूवादी, राजीववादी आहे, पण राहुलवादी नाही’’ ; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर थेटच बोलले..!

Pune Shivjayanti : रस्त्याच्या कामामुळे शिवजयंती मिरवणूक मार्गात बदल; महापौरांचे आदेश

SCROLL FOR NEXT