पुणे

पुणे विभागात उभारणार ऑक्सिजनचे १६ नवे प्लॅंट

राज्य सरकारचे मिशन ऑक्सिजन स्वावलंब धोरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे: पुणे विभागामध्ये प्रती दिन सुमारे २०० मेट्रिक टन ऑक्सिजनचे १६ नवे प्लॅंट उभारण्याची तयारी उद्योगांनी दर्शविली असून त्यासाठीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. येत्या सहा महिन्यांत हे प्लॅंट सुरू झाल्यास त्यांना भांडवली खर्चात १० ते २० टक्के अनुदान देण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे.(16 new oxygen plants to be set up in Pune division)

ऑक्सिजन स्वावलंब धोरण

१) प्रती दिन २५ ते ५० टन ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लॅंट ३१ डिसेंबरपर्यंत तर ५० टन प्रती दिन किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचे प्रकल्प पुढील वर्षी जूनपर्यंत कार्यान्वित झाल्यास त्यांना भांडवली खर्चात १० ते २० टक्के अनुदान मिळणार (कमाल अनुदान ५ ते १० कोटी रुपये)
२) प्रकल्पाच्या क्षमतेनुसार ७, ९ आणि १२ वर्षे त्यांना ‘जीएसटी’ (वस्तू आणि सेवा कर) परतावा १०० टक्के मिळणार
३) विशिष्ट कालावधीसाठी विद्युतदरात दोन रुपये प्रती युनिट रिफंड मिळणार
४) एमआयडीसीमध्ये ऑक्सिजन प्लॅंटसाठी २५ ते ५० टक्के सवलतीच्या दरात डिसेंबरपर्यंत प्राधान्याने भूखंड मिळणार
५) महापालिका क्षेत्रात अथवा कोणत्याही औद्योगिक विभागात (झोन) ऑक्सिजन निर्मिती प्लॅंट उभारता येणार
६) विदर्भ-मराठवाडा, धुळे-नंदुरबार, सिंधुदुर्ग-रत्नागिरी विभागात ऑक्सिजन प्लॅंटसाठी विशेष सवलत


''ऑक्‍सिजन प्लॅंटची संख्या वाढावी, यासाठी राज्य सरकारने मिशन ऑक्सिजन स्वावलंब धोरण तयार केले आहे. त्यात चांगल्या प्रकारच्या सवलती दिल्या आहेत. त्यामुळे ७ ते ९ वर्षांत प्रकल्पाचा खर्च वसूल होऊ शकतो. ऑक्सिजन प्लॅंटची संख्या वाढण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.''
- सदाशिव सुरवसे,
उद्योग सहसंचालक, पुणे विभाग

असे उभारणार प्लॅंट

- जेजुरी ः दोन
- यवत, मरकळ आणि शिवणे ः तीन
- कोल्हापूर, सातारा आणि सोलापूर ः प्रत्येकी तीन
- सांगली ः दोन

काय होणार

- १६ प्लॅंटमधून प्रती दिन सुमारे २०० मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती
- प्रत्येक प्रकल्पाची क्षमता वेगवेगळी
- प्रत्येकी पाच पट ऑक्सिजन साठवणुकीची क्षमता

पुणे विभागातील स्थिती

- सुमारे २०० टन क्षमतेचे ऑक्सिजनचे नऊ प्लॅंट
- २८ रिफिलिंग प्लॅंट
- सर्व प्रकल्पांत तयार होणारा ऑक्सिजन ८० टक्के औद्योगिक क्षेत्रासाठी तर २० टक्के वैद्यकीय क्षेत्रासाठीही वापरला जाऊ शकतो.
- रुग्णालयांनीही ऑक्सिजन निर्मितीचे प्लॅंट उभारण्याची प्रक्रिया सुरू केली असून साठवणुकीसाठी टाक्याही उभारत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Ticket Booking: यूजर-फ्रेंडली डिझाइन, कमी स्टेप्स आणि फास्ट बुकिंग! IRCTC संकेतस्थळाचा कायापालट, कधी होणार सुरू?

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : कामरगाव अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी नागरिक एकवटले

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

SCROLL FOR NEXT