Crime_Molest 
पुणे

सुधारणार नाही; येरवड्यातून बाहेर येताच नराधमाने अल्पवयीन मुलीचा केला विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

लोणी काळभोर (पुणे) : पॅरोलवर येरवडा कारागृहातून काही दिवसाकरीता बाहेर आलेल्या एका अट्टल गुन्हेगाराने कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत, तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (ता.७) दुपारी उघडकीस आला आहे.  

पीडीत मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लोणी काळभोर पोलिसांनी सचिन सुभाष कदम ( वय. ४५, रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, ता. हवेली) या अट्टल गुन्हेगारांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सचिन कदम याच्यावर लोणी स्टेशन येथील एका गुन्हेगारांचा खून केल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी फरार झाला असून, आरोपींला अटक करण्यासाठी पोलिस पथक रवाना झाले असल्याची माहिती लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांनी दिली आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडीत मुलगी गुरुवारी दुपारी साडे बारा वाजनेच्या सुमारास एकटीच घरी असल्याचे पाहून, सचिन कदम याने संबधित मुलीच्या घरात प्रवेश केला. तसेच तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न सुरु केला. यावेळी संबधित मुलीने ओरडण्याचा प्रयत्न केला असता, सचिन कदम याने संबधित मुलीचे तोंड हाताने दाबले. तसेच तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. मात्र मुलीने सचिनच्या हातातून निसटण्याचा प्रयत्न करताच, सचिनने घराबाहेर पळ काढला. तसेच घरापासून पळून जाताना, पीडित मुलीच्या घराबाहेर उभी असलेल्या दुचाकीचा आरसाही फोडला. 

दरम्यान सचिन दूर गेल्याची खात्री पटताच, मुलीने आपल्या नातेवाईकांशी फोनवरुन संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली. यावर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तात्काळ लोणी काळभोर पोलिसात जाऊन, सचिन कदम याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर करत आहेत.

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

SCROLL FOR NEXT