Hording Sakal
पुणे

पुणे शहरात होर्डिंगची १६० कोटीची थकबाकी

पुणे शहराच्या सर्वच भाग होर्डिंगचा सुळसुळाट झाला आहे, त्यावर महापालिकेला नियंत्रण ठेवताना नाकी नऊ येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे शहराच्या सर्वच भाग होर्डिंगचा सुळसुळाट झाला आहे, त्यावर महापालिकेला नियंत्रण ठेवताना नाकी नऊ येत आहे.

पुणे - शहरात (Pune City) हजारो होर्डिंग (Hording) असताना त्यातील २ हजार २०० पेक्षा होर्डिंग व्यावसायिकांनी २०१४ पासून शुल्क (Fee) भरले नसल्याने महापालिकेच्या (Pune Municipal) लेखापरिक्षण विभागाने तब्बल १५९ कोटी १० लाख २२ हजार ८७९ रुपयांची वसूली (Recovery) काढली आहे. लेखापरीक्षण विभागाने ही रक्कम वसूल करण्यासाठी स्थायी समितीसमोर लेखापरीक्षण अहवाल सादर केला आहे.

पुणे शहराच्या सर्वच भाग होर्डिंगचा सुळसुळाट झाला आहे, त्यावर महापालिकेला नियंत्रण ठेवताना नाकी नऊ येत आहे. होर्डिंगची परवानगी घेतल्यानंतर त्यासाठी महापालिकेचे प्रति मिटर २२२ रुपये इतके शुल्क भरावे लागते. तसेच दरवर्षी त्याचे नूतनीकरण करतानाही ही शुल्क आकारले जाते. जर वेळेत शुल्क भरले नाही तर महापालिकेकडून पाच पट दंड आकारला जातो. महापालिकेच्या लेखापरिक्षण विभागाने आकाश चिन्ह विभागाकडील २०१४-१५ ते २०२०-२१ या वर्षातील प्रकरणांची तपासणी केली. त्यामध्ये आक्षेपार्ह बाबी व वसूलपात्र रक्कम दाखविण्यात आली आहे.

महापालिकेने परवाना शुल्क न भरणाऱ्यांसाठी तडजोड शुल्क पाचपट निश्‍चीत केले होते, पण त्याविरोधात होर्डिंग व्यावसायिकांनी न्यायालयात याचिका दाखल केली, त्यात पाच पट शुल्क घेणे अयोग्य असल्याचा निर्णय देण्यात आला. त्यानुसार लेखापरिक्षण विभागाने केलेल्या तपासणीत २०१४-१५ पासूनचे परवाना शुल्क रक्कम ६९ कोटी ३२ लाख, तडजोड शुल्क ३ कोटी ६९ लाख आणि २०२०-२१ या वर्षाचे शुल्क ३२ कोटी ६३ लाख रुपये आहे. तसेच मागील अहवालातील ५३ कोटी ४४ लाख रुपये रक्कम पालिकेला मिळालेली नाही. अशी १५९ कोटी १० लाख रुपये रक्कम येणे बाकी आहे. त्यासंदर्भात आयुक्तांनी निर्णय घ्यावा असा अहवाल मुख्य लेखा परिक्षक अमरिश गालिंदे यांनी स्थायी समितीला सादर झाला आहे. याबाबत महापालिका आयुक्त काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT