Pune Crime sakal
पुणे

Pune Crime : दांपत्याने चोरलेली १७ वाहने जप्त

शहर, परिसरातून दुचाकी तसेच मोटारी चोरणाऱ्या दांपत्याला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ लाख ७० हजार रुपयांची १७ वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या वाहनांमध्ये आठ मोटारी आणि नऊ दुचाकींचा समावेश आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शहर, परिसरातून दुचाकी तसेच मोटारी चोरणाऱ्या दांपत्याला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १२ लाख ७० हजार रुपयांची १७ वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या वाहनांमध्ये आठ मोटारी आणि नऊ दुचाकींचा समावेश आहे. सासवड रस्त्यावरील वडकीनाला परिसरातून या दोघांना अटक करण्यात आली आहे.

शाहरुख राजू पठाण (वय २४) आणि आयशा शाहरुख पठाण ऊर्फ पूजा जयदेव मदनाल (वय २१, दोघे रा. कुंजीरवाडी, लोणी काळभोर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पठाण दांपत्याने वारजे माळवाडी, कोरेगाव पार्क, सिंहगड रस्ता आणि हडपसर भागातून वाहने चोरल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याविरुद्ध यापूर्वी वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. सिंहगड रस्ता परिसरातून वाहने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती.

याबाबत दाखल असलेल्या गुन्ह्यांचा सिंहगड रस्ता पोलिसांकडून गेल्या दोन महिन्यांपासून तपास सुरू होता. तपासात पोलिसांना चोरटे सासवड रस्त्यावरील वडकी नाला परिसरात थांबल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने पठाण दांपत्याला पकडले.

पठाण दांपत्य पुण्यातून वाहने चोरून नागपूर आणि शिर्डी परिसरात विक्री करत असल्याची माहिती पुढे आली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार, साहाय्यक निरीक्षक सचिन पाटील, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, उत्तम तारू, राहुल ओलेकर, शिवाजी क्षीरसागर यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT