swim. pune
पुणे

विहीरीत पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

विहीरीत पोहण्यासाठी गेलेल्या एका सतरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला असल्याची घटना कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कोलते वस्ती येथे घडली आहे.

जनार्दन दांडगे.

विहीरीत पोहण्यासाठी गेलेल्या एका सतरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला असल्याची घटना कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कोलते वस्ती येथे घडली आहे.

उरुळी कांचन - विहीरीत पोहण्यासाठी गेलेल्या एका सतरा वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाला असल्याची घटना कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कोलते वस्ती येथे घडली आहे.

दयानंद प्रकाश रणदिवे (वय-१७ रा. कळंब, जिल्हा उस्मानाबाद) असे बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दयानंद रणदिवे हा कोरेगाव मूळ या ठिकाणी राहणाऱ्या त्याच्या नातेवाईकांकडे आला होता. नातेवाईकांनी त्यांची दोन मुले व दयानंद यांना गुरे राखण्यासाठी पाठवले होते. गुरे राखायला गेल्यानंतर तिघेजण कोरेगाव मूळ येथील कोलते वस्ती येथील एका विहीरीवर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी गेले होते. मात्र दयानंद ला पोहता येत नसताना हि तो विहरीत उतरला. तसेच त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने व विहरीत असलेल्या गाळामुळे त्याला विहीरीतून निघता न आल्याने मृत्यू झाल्याचे त्याठिकाणी असलेले नागरिक सांगत होते.

दरम्यान, दयानंद याचा मृतदेह काढण्यासाठी फायर ब्रिगेड, पोलीस प्रशासन व ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आला.

यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, सदशिव गायकवाड, पोलीस शिपाई किशोर कुलकर्णी, भगत, कोरेगाव मूळच्या पोलीस पाटील वर्षा कड, स्थानिक नागरिक आपासाहेब कड आदि ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Update : नेपाळच्या पुरात महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, राज्य सरकारचे प्रयत्न सुरू, 4 जण सुरक्षित; मंत्री शंभूराज देसाईंनी दिली महत्त्वाची अपडेट

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

Sunetra Pawar: चिमुकलीवरील अत्याचार-हत्या प्रकरणी उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार आक्रमक; आरोपीला फाशीची शिक्षा मिळवून देण्याची ग्वाही

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Tukaram Mundhe: तुम्ही जे खाताय ते खरंच सुरक्षित आहे का?, खरेदी करण्याआधी हे तपासा... तुकाराम मुंढेंनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

SCROLL FOR NEXT