पुणे

भूसंपादनासाठी १८५ कोटी ४३ लाख

सकाळवृत्तसेवा

पुणे - चांदणी चौकातील उड्डाण पुलासाठी ताब्यात घेण्यात येणाऱ्या जागांच्या मालकांना मोबदला  म्हणून सुमारे १८५ कोटी ४३ लाख  रुपये देण्यात येणार असून, त्याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत गुरुवारी मंजूर झाला. 

परवानाधारक मिळकतींच्या मालकांना रोख स्वरूपात मोबदला देण्यात येणार असून, या प्रकल्पाला गती देण्याच्या उद्देशाने भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने करण्याचा केंद्र  आणि राज्य सरकारचा प्रयत्न आहे. ही रक्कम राज्य सरकारकडून मिळणार असली, तरी सध्या मात्र महापालिकेच्या तिजोरीतून द्यावी लागणार आहे.  त्यानंतर तीन टप्प्यांत राज्य सरकारकडून ती उपलब्ध होणार असल्याचे  महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. 

महापालिकेच्या शाळांमधील बालवाडी शिक्षिका आणि सेविकांच्या पगारात वाढ करण्याचा  निर्णय सर्वसाधारण सभेत  घेण्यात आला; तसेच शिक्षिका आणि सेविकांना प्रसूतीच्या काळात सहा महिन्यांची रजाही मिळेल.  या निर्णयानुसार १० वर्षांपेक्षा कमी सेवा झालेल्या शिक्षिका महिन्याकाठी दहा हजार आणि सेविका साडेसात हजार रुपये पगार मिळेल. शिवाय १० वर्षांपेक्षा अधिक सेवा झालेल्या शिक्षिकांना ११ हजार ५००; तर सेविकांना ८ हजार ५०० रुपये पगार मिळणार  आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक दोन वर्षांनी पगारात प्रचलित धोरणानुसार वाढ करण्यालाही मंजुरी देण्यात आली. या निर्णयाचे सर्वपक्षीय सदस्यांनी स्वागत केले. 

पुनर्सिंचनाच्या निधीला विरोध
शहराच्या पूर्व भागाला पाणीपुरवठा व्हावा, यासाठी आखलेल्या भामा आसखेड प्रकल्पाअंतर्गत पुनर्सिंचनासाठी १६२ कोटी रुपये देण्याच्या महापालिका प्रशासनाच्या निर्णयाला विरोध झाला. मुळात या धरणातून शेतीसाठी पाणी वापरण्यात आले नसल्याचे सांगत, एवढे पैसे का द्यायचे, असा प्रश्‍न विरोधकांनी लावून धरला. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांची भाषणे झाली. त्यानंतर राज्य सरकारशी चर्चा करण्यात येईल, तोपर्यंत केवळ अर्थशीर्षक खुले करण्यात येईल, असे सांगण्यात आले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MG Road वरील खाऊ गल्लीत FDA ची धडक कारवाई; परवाना नसलेल्या पाच खाद्यविक्रेत्यांना व्यवसाय बंद करण्याचे आदेश

Yuzvendra Chahal 400 T20 Wickets: युझवेंद्र चहलने इतिहास रचला... ट्वेंटी-२०मध्ये असा पराक्रम करणारा पहिला भारतीय गोलंदाज

Youngest Demat Account Holder : वय अवघे ६ दिवस अन् थेट शेअर बाजारात एन्ट्री! १२ दिवसांचा जुना रेकॉर्ड मोडत दिल्लीच्या चिमुकल्याने रचला नवा विश्वविक्रम

Sudhir Mungantiwar : "आपलं सरकार इंग्रजांपेक्षाही वाईट..."; सुधीर मुनगंटीवार आक्रमक, मुख्यमंत्र्यांसमोरच मांडली भूमिका, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : सोनं-चांदी दरात पुन्हा घसरण; सोनं 2 हजार 800 रुपयांनी तर चांदी चार हजार रुपयांनी घसरली

SCROLL FOR NEXT