Crime News esakal
पुणे

Pune : बाल मैत्रिणीने गळफास लावला म्हणून तिने केली आत्महत्या; पुणं हादरलं

हडपसर परिसरातील शेवाळेवाडी येथे ही धक्कादायक घटना घडली.

सकाळ डिजिटल टीम

Pune Hadapsar sucide News : जीवलग मैत्रीणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समजल्यावर दुसऱ्या मैत्रिणीने इमारतीच्या धतावरून उडी मारून आत्यहत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसर परिसरातील शेवाळेवाडी येथे ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही मुलींनी अशाप्रकारे जीवन का संपवले असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. आकांक्षा औदुंबर गायकवाड (वय १९) आणि सानिका हरिश्चंद्र भागवत (वय १९) अशी आत्महत्या केलेल्या तरूणींची नावे आहेत.

स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आकांक्षा व सानिका या दोघीही मैत्रिणी होत्या. सात वाजण्याच्या सुमारास सानिका हिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. रुग्णवाहिकेतून सानिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी घेऊन जात असताना आकांक्षाने पहिले. त्याचवेळी आकांक्षाने पाचव्या मजल्यावरून रुग्णवाहिकेजवळ उडी मारली. त्यातच तिचा जागीच मृत्यू झाला.

सानिकाने सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अभिनंदन इमारतीमधील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आकांक्षाला हे समजल्यावर ती सानिकाच्या घरी गेली होती. या घटनेचा धक्का सहन न झाल्याने तीनेही याच इमारतीच्या टेरेसवरून सायंकाळी सातच्या सुमारास उडी मारून आत्महत्या केली. दोघींच्याही आत्महत्येचे कारण अद्याप समजले नसून पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price Today: LPG सिलेंडर 209 रुपयांनी स्वस्त! पेट्रोल, डिझेल आणि CNG चेही नवे दर जाहीर

Maharashtra Loan Waiver: अद्याप २०१७ ची कर्जमाफी प्रलंबित, ६ लाख ६४ हजार शेतकरी ९ वर्षांपासून लाभाच्या प्रतीक्षेत

Corporators Disqualification: महाराष्ट्रात राजकीय खळबळ! 23 नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा; भाजपचे 7, एमआयएमचे 16 सदस्य रडारवर

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये खड्ड्यामुळे पुन्हा अपघात, तरुण गंभीर; डोक्यावर शस्त्रक्रिया

Beed ACB: सुनेत्रा पवारांच्या बैठकीनंतर घरी गेला अन् ४५ लाखांची लाच घेतली; वन अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT