Pune Municipal Corporation Sakal
पुणे

पुणे शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी १९३ कोटीची निविदा

पुणे शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी अखेर पुणे महापालिकेने १९३ कोटी रुपयांची अल्प मुदतीची निविदा काढली आहे.

ब्रिजमोहन पाटील @brizpatil

पुणे शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी अखेर पुणे महापालिकेने १९३ कोटी रुपयांची अल्प मुदतीची निविदा काढली आहे.

पुणे - शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी अखेर पुणे महापालिकेने १९३ कोटी रुपयांची अल्प मुदतीची निविदा काढली आहे. यामध्ये शहरातील प्रमुख ५० रस्ते विविध १४० ठिकाणी खरडून काढून पूर्णपणे डांबरीकरण केले जाणार आहे. तर काही सिमेंटचे रस्ते असून, त्यावर ६ इंचाचे नवा थर टाकला जाणार आहे. या रस्त्यावर भविष्यात कोणतेही खोदकाम होणार नाही यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.

पुणे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. समान पाणी पुरवठा योजना, मलःनिसारण वाहिनी, पावसाळी गटारे, विद्युत वाहिनी, मोबाईल केबल यासह आदी कारणांमुळे रस्त्यांवर वारंवार खोदकाम झाले. त्यानंतर खड्डे सिमेंट काँक्रिट किंवा डांबर टाकून बुजविण्यात आले, पण हे काम व्यवस्थित केले नसल्याने रस्ते खचले आहेत. त्याठिकाणी वारंवार सिमेंट व डांबर टाकल्याने रस्ते समपातळीत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे. शिवाय शहरात कायम वाहतूक कोंडी होत आहे. महापालिका प्रशासनावर पुणेकरांनी संताप व्यक्त केल्यानंतर ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पण शहरातील रस्त्यांची स्थिती अद्यापही खराबच आहे.

शहरात २०२३ मध्ये ‘जी २०’ ही आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. परदेशातील मंत्री, बँकांचे अधिकारी उपस्थित राहणार असल्याने रस्ते सुस्थितीत आणणे व सुशोभीकरण करणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. पथ विभागाने केलेल्या सर्वेक्षणात संपूर्ण शहरात ५०० कोटी रुपयांचे रस्ते डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यात पहिल्या टप्प्यात ५० रस्ते, १४० ठिकाणी व १४० किलोमीटर लांबीचे डांबरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी १९३ कोटी ४७ लाख ११ हजार ६८६ रुपये इतका खर्च येणार आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या असून, पुढील १५ दिवसात निविदा प्राप्त झाल्यानंतर त्यांची कागदपत्रांची तपासणी व स्थायी समितीच्या मान्यतेनंतर लगेच डांबरीकरण सुरू होईल. पुढील ६ महिन्यात हे सर्व काम संपणार आहे. सध्या पहिल्या टप्प्यातील १९३ कोटीचे काम केले जाणार आहे. पुढील १५ दिवसात उर्वरित २ टप्प्‍यांच्या सुमारे ३०० कोटी रुपयांच्या निविदा निघणार आहेत.

‘१९३ कोटी रुपयांचे डांबरीकरणासाठी निविदा काढली आहे. यापैकी ५५ कोटी रुपये हे सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यासाठी आहेत. या रस्त्यांवर ६ इंचाचा सिमेंटचा थर टाकला जाईल, त्यामुळे पुढील १५ वर्ष रस्ते चांगले राहतील. तर ज्या ठिकाणचे डांबरी रस्ते खराब झाले आहेत, तेथील भाग खरडून काढून डांबरीकरण केले जाईल. हे सर्व काम चांगल्या गुणवत्तेने झाले पाहिजे यासाठी लक्ष ठेवले जाणार आहे. त्रयस्थ संस्थेकडून ही कामे तपासून घेतले जातील.’

- विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

असे होणार रस्ते चकाचक

- व्हिज्युअल इन्स्पेक्शन व रेफो मीटरद्वारे रस्त्यांचे सर्वेक्षण

- ५० रस्ते १४० ठिकाणी खराब आहेत, त्यांची लांबी १४८ किलोमीटर इतकी आहे

- महत्त्वाचे जोड रस्ते, वर्दळ, रस्त्यावरील वाहतूक व सद्यःस्थितीचा विचार करून ५० रस्त्यांची निवड

- ७ रस्‍ते काँक्रिट व युटीडब्ल्यूटी व ४३ रस्त्यावर डांबरीकरण होणार

- तीन प्रकारात रस्त्यांची विभागणी

रस्त्यांचे वर्गीकरण

पॅकेज - रस्त्यांची संख्या - कामाचे स्वरूप - अपेक्षीत खर्च

एक - ७ - काँक्रिटीकरण व यूटीडब्ल्यूटी- ६६. ९९ कोटी

दोन - १४ - डांबरीकरण,डीबीएम, बीसी - ६३.४७ कोटी

तीन - २९ - डांबरीकरण,डीबीएम, बीसी - ६२.९९ कोटी

एकूण रस्ते - ५० - -------------------- - १९३.४७ कोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT