Pune Railway News sakal
पुणे

Pune Railway News : पुण्याहून १९६१ विशेष रेल्वे गाड्या ; तिकीटदर जास्त,उत्पन्नात वाढ

प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वे प्रशासनाने मागील आर्थिक वर्षात पुण्याहून विशेष दर्जा असलेल्या तब्बल १९६१ गाड्या सोडल्या. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ही संख्या ६५८ इतकीच होती. विशेष गाड्यांना वेगळा दर्जा असल्याने तिकीटदर जास्त असतो.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : प्रवाशांच्या सोईसाठी रेल्वे प्रशासनाने मागील आर्थिक वर्षात पुण्याहून विशेष दर्जा असलेल्या तब्बल १९६१ गाड्या सोडल्या. त्यापूर्वीच्या आर्थिक वर्षात ही संख्या ६५८ इतकीच होती. विशेष गाड्यांना वेगळा दर्जा असल्याने तिकीटदर जास्त असतो. त्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नातही मोठी वाढ झाली.

रेल्वे प्रशासनाने गर्दीच्या हंगामात अतिरिक्त गाड्या सोडल्या. दिवाळी, नाताळ, होळी आदी प्रमुख सणांच्या वेळी या गाड्या सोडण्यात आल्या. उन्हाळ्यात अनेक प्रवासी पर्यटनाचा बेत आखतात. सुट्ट्यांचा हंगाम आल्यावर नेहमीच्या वेळापत्रकातील गाड्यांना गर्दी असतेच. शिवाय विशेष गाड्यांनाही गर्दी होते. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या कालावधीत विशेष गाड्या वाढविल्या. त्यामुळे प्रवाशांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला.

गर्दीच्या हंगामात अनेक प्रवाशांना आरक्षित तिकीट मिळत नाही. अशा प्रवाशांना गावी जाणे अवघड होते. त्यांच्यासाठी रेल्वेने विशेष गाड्यांची सोय उपलब्ध करून दिलेली असते. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभला, तर आम्ही अशा गाड्यांच्या फेऱ्या वाढवितो.

- डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, पुणे

दानापूर, नागपूर आणि दिल्लीला विशेष रेल्वे

रेल्वे प्रशासनाने पुण्याहून दानापूर, नागपूर व हजरत निजामुद्दीनसाठी (दिल्ली) विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. दानापूरसाठी ८, नागपूरसाठी ३८ व हजरत निजामुद्दीनसाठी २४ फेऱ्या होतील., पुणे-दानापूर सुपरफास्ट एक्स्प्रेस ११, १४ एप्रिल व दोन, पाच मे रोजी पुण्याहून सकाळी ६.३० वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता दानापूरला पोहचेल. दानापूर-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस १२, १५ एप्रिल व तीन, सहा मे रोजी दानापूरहुन दुपारी दीड वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी ७.४५ वाजता पुण्याला पोहचेल.

पुणे-नागपूर सुपरफास्ट आठवड्यातून दोन दिवस धावेल. १४ एप्रिल ते १६ जून दरम्यान दर मंगळवारी व रविवार पुण्याहून दुपारी ३.५० वाजता ही गाडी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहचेल. नागपूर-पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस १३ एप्रिल ते १५ जून दरम्यान दर सोमवारी व शनिवारी नागपूरहून सायंकाळी ७.४० वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता पुण्याला पोहचेल.

पुणे-हजरत निजामुद्दीन साप्ताहिक रेल्वे १२ एप्रिल ते २८ जून दरम्यान दर शुक्रवारी पुण्याहून संध्याकाळी ५.३० वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी दुपारी ४.४५ वाजता दिल्लीला पोहचेल. हजरत निजामुद्दीन-पुणे साप्ताहिक गाडी १३ एप्रिल ते २९ जून दरम्यान दर शनिवारी हजरत निजामुद्दीन येथून रात्री १०.१० वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी रात्री ११.५५ वाजता पुण्याला पोहचेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA Sangli Housing : अवघ्या 15 लाखांत हक्काचं घर! 'म्हाडा'चा 354 कुटुंबीयांना निवारा, 'या' योजनेतून अनेकांची स्वप्नपूर्ती; सांगलीत घरांची बंपर लॉटरी

Ekadashi Horoscope : उद्या देवशयनी एकादशीला बनतोय दुर्मिळ योग! 'या' 5 राशीच्या लोकांची मोठी इच्छा होणार पूर्ण; धनलाभ ठरेल गेमचेंजर

Latest Marathi News Live Update : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नित्यानंद राय यांनी मांडले राष्ट्रीय सन्मान दुरुस्ती विधेयक

Vishnupuri Dam: प्रकल्प तहानलेलेच! विष्णुपुरीत ३३.४५ टक्के साठा

Bhokardan Theft: चहासाठी थांबल्या, नऊ लाख गेले; वाहनाची काच फोडून रक्कम लंपास, बचत गटाच्या महिलांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT