पुणे

पुस्तकांच्या जगात - पान १५

CD

पुस्तकांच्या जगात - पान १५
---------------------
एकोणिसाव्या शतकातील स्त्री प्रश्‍नांची चर्चा
---------------------
‘करुणाष्टके’ नाटक असो की प्रतिभा रानडे लिखित ‘स्त्री प्रश्‍नांची चर्चा : एकोणिसावे शतक’ हे पुस्तक स्वातंत्र्य झगडूनच मिळवावे लागते. मागील पिढ्यांनी केलेल्या झगड्यावर, छोट्यामोठ्या बंडावर आजचे आपले स्वातंत्र्य उभे आहे, याची जाणीव मनात कायम ठेवली पाहिजे.
-----------------------------
मध्यंतरी ‘करुणाष्टके’ हे नाटक पाहिले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजामध्ये विधवांचे केशवपन करण्याची प्रथा होती. सदर नाटकातील दुर्गा ही नायिका स्वतःच्या केसाचे मुंडण करण्यास नकार देऊन या प्रथेला आव्हान देते. हे नाटक बघताना प्रतिभा रानडे लिखित ‘स्त्री प्रश्नांची चर्चा : एकोणिसावे शतक’ या पुस्तकाची आठवण आली. काळ पुढे जातोय तशी आपल्या समाजाची स्त्री प्रश्नाबद्दलची जाणीव विस्तारत आहे. या जाणिवांच्या उगमाचा आणि विकासाचा अभ्यास करण्यासाठी लेखिका प्रतिभा रानडे यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाचा शोध घेऊन तो सदर पुस्तकाच्या माध्यमातून सादर केला आहे. त्यासाठी लेखिकेने एकोणिसाव्या शतकात प्रसिद्ध झालेली वृत्तपत्रे, मासिके यांसारख्या ऐतिहासिक साधनांचा प्रातिनिधिक स्वरूपातील धांडोळा घेतला आहे.
पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये लेखिका सांगते, की कोणत्याही समस्या या सुट्या सुट्या नसतात. त्यांची परस्परांत गुंतागुंत झालेली दिसते. उदाहरणार्थ, स्त्री शिक्षणाची समस्या ही बालविवाहाची पद्धत, विधवा विवाहाला बंदी, स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सर्वांशी जोडलेली आहे. त्यामुळेच सुमारे चारशे पानांचे हे पुस्तक स्त्रीशिक्षण, बालविवाह, वैधव्य व स्त्री कडे पाहण्याचा दृष्टिकोन या चार मुद्द्यांच्या संदर्भातून एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील स्त्री जीवनाकडे पाहण्याचा प्रयत्न करते. पुस्तकांमध्ये या चार मुद्द्यांवरील एकेक प्रकरण व उपसंहार अशी एकूण पाच प्रकरणे आहेत. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी संदर्भ सूची दिलेली आहे. जिज्ञासू वाचकांना त्यातून आज विस्मरणात गेलेल्या अनेक जुन्या पुस्तकांबद्दल माहिती मिळेल.
आज आपल्या समाजाने मुलींचे शिक्षण मनोमन स्वीकारले आहे, पण इ.स. १८००ते १९०० या काळात महाराष्ट्रात मुलींनी शिकावे की नाही, याबद्दल वर्तमानपत्रांमधून चर्चा व वादविवाद होत होते. भात, पिठले करता येऊन दोन पानांचा स्वयंपाक जमणे, ही मुलींसाठीची मॅट्रिकची परीक्षा होती. शिक्षणाने कुतूहल निर्माण होते, प्रश्न पडू लागतात, ज्ञान दडपणाखालून मुक्त होऊ पाहते, त्यामुळे स्त्रियांना शिकविण्याची भीती समाजाला वाटत होती. सात, आठ वर्षांची होत नाही तोच मुलींची लग्न होत. मग सणवार व्रतवैकल्ये यामध्ये त्या गुंतून पडत, वयाच्या १३, १४ वर्षांपासून त्यांची बाळंतपणे सुरू होत. या सर्वांतून सवड काढून त्या शाळेत कधी जाणार असे प्रश्न लोकांना पडत होते. समाजातील आणि घरातील वडीलधाऱ्या बायकांचा स्त्री शिक्षणाबद्दलचा सूर अत्यंत हेटाळणीचा असे. एखाद्या सुधारक विचाराच्या नवऱ्याच्या इच्छेमुळे शिक्षण घेणाऱ्या स्त्रीचा इतर स्त्रिया छळ करत, त्यामुळे त्या मुलींच्या मनात देखील शिक्षणाबद्दल गोडी नसे. आपल्या समाजाने स्त्री शिक्षणासंदर्भातील असे कोणकोणते अडथळे ओलांडले आहेत, हे या पुस्तकातून समजते. या चर्चांसोबतच ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी यांसारख्या स्त्रियांचे शिक्षण, फुले दांपत्याची शाळा, हंटर कमिशन, मिशनऱ्यांच्या शाळा अशा विविध मुद्द्यांबद्दलचे अनेक तपशील एका ठिकाणी वाचता येतात.
ज्या समाजात एकविसाव्या शतकात देखील मोठ्या संख्येने बालविवाह होतात, त्या समाजाची एकोणिसाव्या शतकातील बालविवाहासंदर्भातील स्थिती किती भयंकर असेल याचा आपण अंदाज बांधू शकतो. या पुस्तकातील बालविवाहाबद्दलचे तपशील आपल्याला अस्वस्थ करतात. नामवंतांचे बालविवाह, दडपणाखाली झालेले बालविवाह, बालवधूची बालसासू, जरठ- कुमारी विवाह, बालविवाह विरोधी चळवळ, बालविवाह अमान्य करण्याचे धारिष्ट्य दाखविणाऱ्या रखमाबाई राऊतांचा लढा, फुलमणी खटला, संमतिवयाचा कायदा इ. विविध मुद्द्यांची माहिती या प्रकरणात मिळेल.
बालविवाह पद्धतीचा एक अपरिहार्य परिणाम म्हणजे स्त्रीला येणारे अकाली वैधव्य. आजही विधवांची स्थिती शोचनीय असते. एकोणिसाव्या शतकात तर विधवा स्त्रीला कोणी फसवले तर जन्माला येणाऱ्या मुलाच्या गळ्याला नख लावणे किंवा स्वतः जीव देणे यापेक्षा दुसरा पर्यायच त्या स्त्रीला उपलब्ध नव्हता. याला पर्याय उभी करणारी बालहत्या प्रतिबंधक गृहे, सती प्रथा विरोध, केशवपन प्रथा विरोध, पुनर्विवाह बंदी विरोध, महत्त्वाचे पुनर्विवाह इ. मुद्द्यांबद्दल या प्रकरणात माहिती मिळेल. या पुस्तकातील चौथे प्रकरण हे एकोणिसाव्या शतकात समाजाचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता, याचे विवेचन करते. अनेकदा कौटुंबिक जीवनातील स्त्री - पुरुष संबंध हे गुलाम मालक संबंधांसारखे होते हे दाखवते. सदर पुस्तक पद्मगंधा प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: जरांगेंचं उपोषण सुरु असताना नाशिकमध्ये मराठा समन्वयकांची पत्रकार परिषद; SEBC आरक्षणावर ठाम!

करोडपती सासऱ्याने असं काय केलं की ३० वर्षीय सुनेनं थेट रचला कट, ६ लाखांची सुपारी देत संपवलं; धक्कादायक माहिती उघड

Nagara Road Accident : कामाच्या शोधात निघालेल्या मजुरांवर काळाचा घाला! गोंदिया-बालाघाट मार्गावर ट्रक-पीकअपच्या धडकेत 6 जण ठार, 3 वर्षीय बालकाचाही समावेश; 7 गंभीर

Marathi News Live Updates : काल केसनंद, आज खराडी... ऐश्वर्या जाधव यांच्या लावणी कार्यक्रमाला पुन्हा परवानगी नाकारली!

२८ चेंडूंत १३६ धावा! Mumbai Indians च्या फलंदाजाची हवा; १७३ धावांच्या वादळी खेळीने वेधले जगाचे लक्ष, IPL 2027 गाजवण्यासाठी सज्ज

SCROLL FOR NEXT