2 arrested for using abusing words for Bus Conductor in Pune  
पुणे

बस कंडक्टरला शिवीगाळ करणाऱ्या दोघांना अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दुचाकीवरून जाताना पीएमपी वाहकाला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी पहाटे पुणे स्टेशन येथील तुकाराम शिंदे वाहनतळावर घडली.

दलजित ऊर्फ अमित परमिंदर सबरवाल (वय 30, रा. रास्ता पेठ) व सुमीत सुभाष वेळेकर (वय 25, रा. नाना पेठ) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विजयकुमार गायकवाड (वय 30, रा. निगडी) यांनी फिर्याद दिली.

गायकवाड हे पीएमपी बसमध्ये वाहक म्हणून काम करतात. रविवार पहाटे तीन वाजता ते बसमध्ये होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दलजित व सुमीतने त्यांना "तुझी बस इथे का उभी केली,' अशी विचारणा करीत त्यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. सहायक पोलिस निरीक्षक जयंत पाटील तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT