पुणे

पुणे : निर्बंध घातल्यावर काढले सव्वा दोन कोटी

सकाळवृत्तसेवा

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेवर निर्बंध घातल्यानंतरही या प्रकरणातील आरोपींनी बॅंकेतून एकूण दोन कोटी 14 लाख रुपये काढून घेतल्याचे तपासात समोर आले आहे. अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची विशेष न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

बॅंकेतील गैरव्यवहार प्रकरणी विधान परिषद सदस्य अनिल भोसले (वय 55, रा. बाणेर रस्ता), बॅंकेचे संचालक सूर्याजी पांडुरंग जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी तानाजी दत्तू पडवळ (वय-50 रा. तापकीरनगर, काळेवाडी) आणि मुख्य लेखापाल शैलेश संपतराव भोसले (वय 47 रा. नीलज्योती सोसायटी, गोखलेनगर) यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी योगेश लकडे (वय-39, रा. आंबेगाव नऱ्हे) यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी एकूण 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गैरव्यवहार झाल्याचा एकूण आकडा 153 कोटी 50 लाखांपर्यंत गेला आहे. अनिल भोसले आणि जाधव यांच्या सांगण्यावरून पडवळ व शैलेश भोसले यांनी गैरव्यवहाराची रक्कम बॅंकेतून काढली. आरोपींचे बॅंक खाते, स्थावर व जंगम मालमत्तेचा तपास करण्यासाठी, संबंधित रक्कम व गुन्ह्यांच्या अनुषंगाने कागदपत्रे जप्त करण्यासाठी आरोपींना तीन दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकील विलास पठारे यांनी केली होती. 

अनिल भोसले यांना घरचे जेवणे

भोसले यांना रक्तदाब व मधुमेहाचा त्रास आहे. त्यामुळे त्यांना औषधोपचार आणि घरचे जेवण देण्याची मागणी करणारा अर्ज ऍड. शिवम निंबाळकर यांनी केला होता. तो न्यायालयाने मान्य केला आहे. संबंधित औषधे तुरुंगातील डॉक्‍टरांनी तपासून घ्यावे व त्यानुसार ते सुरू ठेवावीत, असा आदेश न्यायालयाने दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain: पावसात वाघोली ठप्प! पुणे-अहिल्यानगर महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनचालकांची मोठी गैरसोय

SIP Investment: दरमहा 10 हजार रुपये गुंतवले तर 1 कोटी कधी होतील? पाहा सोपं गणित

Pune Traffic Jam : पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी तीव्र वाहतूक कोंडी; वाढलेल्या वाहनांमुळे मध्यवर्ती भाग व उपनगर ठप्प

IND vs ENG 2nd T20I Pitch Report: दुसऱ्या टी-20मध्ये फलंदाजांचा बोलबाला की गोलंदाजांची कमाल? जाणून घ्या Pitch Report

Latest Marathi Live Update : मुंबईत ताज हॉटेलसमोरचं मोठं झाड कोसळलं, गाडीचं नुकसान

SCROLL FOR NEXT