COVID 19 
पुणे

पुणे : कोरोना काळात आरोग्य विभागाचे कार्यालयच बंद; कारण...

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर : हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात मागील काही दिवसांपासून जंतुससंर्गाने (viral infection) हैरान असतानाच, त्यांच्या कार्यालयालयामधील दहापैकी दोन कर्मचारी सोमवारी (ता. २०) कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. त्यानंतर उर्वरीत आठ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले. कॅप्टनसह दोन कर्मचारी आजारी पडल्याने, हवेली पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे कार्यालय काही दिवस बंद करण्याची वेळ आरोग्य विभागावर आली आहे. 

आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी आपण स्वतः मागील काही दिवसांपासून जंतुससंर्गाने (viral infection) आजारी असून, कार्यालयीन कामकाज घरुनच चालू ठेवले असल्याची माहिती 'सकाळ'शी बोलताना दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. खरात म्हणाले, हवेली पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या कार्यालयात दहा कर्मचारी असून, त्यापैकी दोन जणांना सोमवारी (ता. २०) कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. उर्वरीत आठ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच आठही जणांची स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे पुढील एक दोन दिवस कार्यालय बंद ठेवण्यात येणार आहे. मात्र कॅप्टनसह टीम आजारी असली तरी, आम्ही सर्वांनीच आरोग्य विभागाचे कामकाज घरुन चालू ठेवले असल्याने हवेली तालुक्यातील नागरिकांनी काळजी करु नये असेही डॉ. खरात यांनी स्पष्ट केले आहे. 

हवेली तालुक्यात रुग्णांचा आकडा पोचला १५११ वर

दरम्यान, सोमवारी दिवसभरात हवेली तालुक्यात ५६ रुग्णांची वाढ झाली असून, तालुक्यातील रुग्णांची संख्या दीड हजारांवर पोचली आहे. सोमवारी दिवसभरात ५० रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून, तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ८७४ झाली असल्याची माहिती डॉ. सचिन खरात यांनी दिली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

डॉ. सचिन खरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दिवसभरात मांजरी बुद्रुक (२३), लोणी कंद (७), भिलारवाडी (१), बुक्रेगाव (१), गोऱ्हे खुर्द (१), खडकवासला (५), किरकिटवाडी (१), कोंडवे-धावडे (१), कुडजे (५), लोणी काळभोर (३), नांदेड (२), नऱ्हे (४), न्यु कोपरे (१) व वाडेबोल्हाई (१) या चौदा ग्रामपंचायत हद्दीत वरील ५६ रुग्ण आढळुन आले आहेत.

(Edited By : Krupadan Awale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोने खरेदी करणाऱ्यांची चिंता वाढली! अवघ्या 6 दिवसांत 50 हजारांनी महाग; आजचा ताजा भाव जाणून घ्या

Uday Samant on NEET Protest : 'नीट आंदोलन विरोधकांनी हायजॅक केलंय'; उदय सामंत यांचा गंभीर आरोप, पेपर फोडणाऱ्यांवर कठोर शिक्षा व्हायलाच हवी

Latest Marathi Update : राहुल गांधींची मोदींवर टीका; 'शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली, धर्मेंद्र प्रधानांना हटवा'

Mumbai Girl Stops Police Van : मुंबईच्या पोरी जिगरबाज! पोरांना अटक केलेली पोलीस व्हॅन पोरीनं अडवली; व्हायरल व्हिडिओ

५० ग्राम पावडर खिशात टाकेल, पूर्ण आयुष्य वाया जाईल...; मुंबई पोलिसांकडून आंदोलक विद्यार्थ्यांना थेट धमकी, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT