20 lakh gold seized from female passenger Pune airport police crime update Sakal
पुणे

Pune Crime : पुणे विमानतळावर महिला प्रवाशाकडून २० लाखांचे सोने जप्त; महिलेविरुद्ध गुन्हा दाखल

महिलेने ग्रीन चॅनल ओलांडल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना तिच्या हालचाली संशयास्पद

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दुबईहून स्पाईसजेट फ्लाइटने पुण्यात आलेल्या एका महिला प्रवाशाकडून २० लाख रुपयांचे ४२३ ग्रॅम सोने सीमा शुल्क विभागाने (कस्टम) जप्त केले आहे. या महिलेने सोन्याची पेस्ट असलेल्या कॅप्सूल लपवून आणल्याचे आढळून आले.

या प्रकरणी एका ४१ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. १) एक प्रवासी महिला स्पाईसजेट एसजी-५२ या विमानाने दुबईहून पुणे विमानतळावर आली. या महिलेने ग्रीन चॅनल ओलांडल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.

तिने तिच्या शरीराच्या आतील भागात काही वस्तू लपवून आणल्याचा संशय आला. कस्टम अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली. तिची रुग्णालयात एक्स रे तपासणी केली असता, तिच्या शरीरात ४२३ ग्रॅमच्या सोन्याची पेस्ट असलेल्या दोन पांढऱ्या कॅप्सूल आढळून आल्या. कस्टम विभागाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युरोपात ३०-३५ डिग्री सेल्सिअसने हाहाकार, भारतात ४५वर पारा पोहोचूनही रस्ते वितळत नाहीत; कारण काय?

५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Small Savings Schemes: PPF आणि पोस्ट ऑफिस FD गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पुढील 3 महिन्यांसाठी व्याजदर जाहीर; पाहा नवे दर

Ramtirth Waterfall : पांढराशुभ्र फेस अन् खळखळणारा आवाज! आंबोलीतील प्रसिद्ध रामतीर्थ धबधबा प्रवाहित; पावसाच्या पाण्यामुळं खुललं सौंदर्य, पर्यटकांची गर्दी

Europe Heatwave: युरोपमध्ये उष्णतेचा कहर! रस्ते वितळले, लोखंडी ट्रॅक वाकले, हजारो नागरिक रुग्णालयात...भयानक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT