पुणे

वीस लाखांचे गोमांस खराळवाडीमध्ये जप्त 

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - अहमदनगरहून नवी मुंबईला जाणारा टेंपो पिंपरी पोलिसांनी सापळा रचून जप्त केला व सुमारे 20 लाख किमतीचे गोमांस जप्त केले. ही कारवाई मुंबई-पुणे महामार्गावर खराळवाडी येथे मंगळवारी (ता. 29) पहाटे तीनच्या सुमारास करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत (ता. 1) पोलिस कोठडी सुनावली आहे. 

अब्दुल रहमान अली महंमद खान (वय 37, रा. आकुर्सीनगर, नेहरूनगर, कुर्ला) असे टेंपोचालकाचे व एहसान महंमद इंद्रासी (वय 19, रा. कसाईवाडा कुर्ला, पश्‍चिम मुंबई), असे दुसऱ्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय 25, रा. रेव्हेन्यू कॉलनी, शिवाजीनगर, पुणे) यांनी फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगरहून मुंबईकडे टेंपोतून गाई व गोवंशाच्या मांसाची वाहतूक होत असल्याची माहिती शिवशंकर स्वामी यांना मिळाली. स्वामी यांनी पिंपरी पोलिसांना खबर दिली, त्यानुसार पोलिसांनी खराळवाडीत सापळा रचून सदर टेंपोची तपासणी केली. तेव्हा गोमांस आढळून आले. या प्रकरणी महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याच्या सुधारित कलमान्वये गुन्हा दाखल करून संशयित आरोपींना अटक केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MBBSनंतर IPS झाले, पुढे एक वर्षात IAS बनले; आता राज्यातून केंद्रात मोठी जबाबदारी, २ अधिकाऱ्यांची बदली

Salman Khan: सलमान खानने बिष्णोई समाजाची माफी मागणार का? 'भाईजान'ला कोणी दिला सल्ला?

Pradeep Purnekar Case: टल्ली, पपलूच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ, गुन्ह्यातील शस्त्रे, हेल्मेटचा शोध; तपासातील गोपनीय नोंदीने चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ मुंबईत दाखल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्वागत!

Shafali Varma: शफाली वर्मावर ICC ची करवाई! झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रागात केलं होतं चुकीचं कृत्य, नेमकं काय?

SCROLL FOR NEXT