Tempo Accident on Katraj Kondhwa Road esakal
पुणे

कात्रज कोंढवा मार्गावर पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांचा टेम्पो पलटी; 20 वारकरी जखमी

कात्रज कोंढवा रस्त्यावर वारकऱ्यांचा (Warkari) टेम्पो पलटी झाल्याची घटना घडली.

सकाळ डिजिटल टीम

पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या परभणी जिल्ह्यातील वारकऱ्यांना घेऊन टेम्पो मुक्कामी निघाला होता.

कात्रज : कात्रज कोंढवा रस्त्यावर वारकऱ्यांचा (Warkari) टेम्पो पलटी झाल्याची घटना घडली असून यामध्ये २० वारकऱ्यांना दुखापत झाली आहे. या प्रकरणी टेम्पो चालकाविरोधात भारती विद्यापीठ पोलिसांत (Bharti University Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (ता. ३०) रात्री उशिरा घडली.

याबाबत प्रयागबाई नारायण बोखारे (वय ७२, रा. फुकटगाव, जि. परभणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, टेम्पोचालक नवनाथ लक्ष्मणराव चाेपडे (रा. धार, जि. परभणी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या परभणी जिल्ह्यातील वारकऱ्यांना घेऊन टेम्पो मुक्कामी निघाला होता. कात्रज-कोंढवा रस्त्यावरील शिवशंभोनगर परिसरात गल्ली क्रमांक १ येथे टेम्पोचालक चोपडे याचे नियंत्रण सुटले. टेम्पो उलटून टेम्पोतील २० वारकऱ्यांना दुखापत झाली.

तक्रारदार प्रयागबाई बोखारे यांच्या डोक्याला, हाताला आणि मनगटालाही दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी वारकऱ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आजचा भारत दहशतवाद सहन करत नाही’; ‘मन की बात’मधून PM मोदींचा थेट संदेश, नेमकं काय म्हणाले?

IND vs WI, 1st ODI: नमन धीरचे भारतासाठी पदार्पण! जडेजाचे कमबॅक, पण सिराजला जागा नाही; कशी आहे Playing XI

Uttarakhand: बद्रीनाथमध्ये हंगामातील पहिला स्नोफॉल; आदि कैलाश यात्रा रोखली, दरडी कोसळल्याने रस्ते ठप्प

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर घणाघात

फुफ्फुसं आकुंचन पावतायत! धूम्रपानासोबत ‘या’ कारणांमुळेही वाढतो COPD चा धोका

SCROLL FOR NEXT