snake 
पुणे

पुणे जिल्ह्यात दोन वर्षांमध्ये 20 हजार सापांना जीवनदान 

सागर आव्हाड

पुणे - जिल्ह्यातील मानवी वस्तीत सापडलेल्या 19 हजार 820 सापांना गेल्या दोन वर्षात जीवनदान मिळाले आहे. पुण्यामधील प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि सर्पमित्रांनी ही कामगिरी केली आहे. 

नागरिकांच्या सहभागामुळे पकडण्यात आलेल्या सापांना पुण्याजवळील राजगड, ताम्हिणी घाट, सिंहगड, खानापूर, पानशेत, लोणावळा आणि भीमाशंकर परिसरात सोडण्यात आले. यात प्रामुख्याने नाग, घोणस, मण्यार, फुरसे, चापडा या विषारी सापांसह धामण, तस्कर, दिवड, गवत्या, कवड्या, मांडून, कुकरी, धुळनागीन, चित्रांग नायकुळ, हरनटोळ, डुरक्‍या घोणस, अजगर, मांजर्या या बिनविषारी सापांचा समावेश आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सापांबरोबर घार, घुबड, पोपट, कबूतर, कोकिळा, गरुड यासह इतर जखमी पक्षांना संस्थेच्या सर्पमित्रांनी जीवनदान दिले आहे. घोरपड, हरिण, उदमांजर, माकड सांबर या प्राण्यांचा देखील यात समावेश आहे. साप पकडण्यासाठी कोणत्याही प्रकारे पैसे घेतले जात नाहीत. वनविभागाच्या सहकार्याने सपांविषयी जनजागृती केली जात आहे. 

पुण्यात वर्षभरात सर्पमित्र व संस्थांकडून सुमारे 20 हजार सर्पांना मानवी वस्तीमधून वाचवले जातात. परंतु, या सापांची नवीन अधिवासात जगण्याची शक्‍यता कमी असते. मानवाला भविष्यात जगण्यासाठी सापांची गरज आहे, हा विचार मनात रुजवला गेला पाहिजे. 
- अजिंक्‍य उनवणे. प्राणिशास्त्राचे अभ्यासक 

जिल्ह्यात जीवदान मिळालेल्या साप, प्राणी व पक्षांची संख्या : 

वाइल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन 
-साप : 1860 
-पक्षी : 860 

वाइल्ड ऍनिमल स्नेक प्रोटेक्‍शन सोसायटी. 
-साप : 6963 
-पक्षी : 498 
-प्राणी : 49 

पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशन. 
-साप : 11,000 
-पक्षी : 800 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

पठ्ठ्याने १६ iPhone तर चोरले पण एक चुकी पडली महागात, पोलिसांनी ट्रेनमधून घेतलं ताब्यात; नेमकं काय घडलं?

Kolhapur Wildlife Attack : अवघ्या सव्वा वर्षांच बाळ वडिलांच्या कुशीत शांत झोपलं अन् कोल्ह्याने बरोबर हेरलं; कोल्हापूरच्या चंदगडमध्ये घडलं भयानक

Latest Marathi News Live Update : नंदुरबारमध्ये गेल्या 15 दिवसापासून व्यावसायिक गॅस पुरवठा ठप्प

Nagpur Gas Cylinder Price: धुराचे लोट; गॅस टंचाईमुळे गृहिणी पुन्हा चुलीकडे! सरपण गोळा करण्यासाठी महिलांची वणवण

SCROLL FOR NEXT