mephedrone seized esakal
पुणे

Mephedrone Seized : कात्रज परिसरात २१ लाखांचे मेफेड्रोन जप्त, राजस्थानमधील दोघांना अटक

कात्रज परिसरात मेफेड्रोन (एमडी) विक्री करण्यासाठी आलेल्या राजस्थानमधील दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कात्रज परिसरात मेफेड्रोन (एमडी) विक्री करण्यासाठी आलेल्या राजस्थानमधील दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून २१ लाख ३८ हजार रुपयांचे १०६ ग्रॅम मेफेड्रोनसह दुचाकी असा २२ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

श्रवणसिंग बलवंतसिंग राजपूत (वय २२, मूळ रा. नयानगर, जि. बाडमेर, राजस्थान) आणि महेश पुनाराम बिश्नोई (वय २०, मूळ रा. कुशलावा, जि. जोधपूर, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. हे दोघे सध्या खराडी परिसरातील तुळजाभवानीनगरमध्ये राहतात.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपूत आणि बिश्नोई मेफेड्रोन विक्रीसाठी कात्रज परिसरात दुचाकीवर येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून दोघांना पकडले. त्यांची झडती घेतली असता २१ लाख रुपये किमतीचे १०६ ग्रॅम मेफेड्रोन आढळून आले. या दोघा आरोपींविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एनडीपीएस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे आणि सहाय्यक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक-दोनचे पोलिस निरीक्षक पंडित रेजितवाड, पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, दिगंबर चव्हाण, पोलिस कर्मचारी चेतन गायकवाड, रवींद्र रोकडे, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, मयूर सूर्यवंशी, दिशा खेवलकर, साहिल शेख, संदीप शेळके, नितीन जगदाळे, आझीम शेख, युवराज कांबळे, दिनेश बास्टेवाड यांनी ही कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

SCROLL FOR NEXT