21 motorcycles and a four-wheeler burnt to ashes in fire behind Ranjangaon MIDC police station
21 motorcycles and a four-wheeler burnt to ashes in fire behind Ranjangaon MIDC police station  
पुणे

रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याच्या आवारात आग; २१ दुचाकी, 1 कार जळून खाक

सकाळवृत्तसेवा

शिरूर  ( पुणे ) : रांजणगाव एमआयीडीसी पोलिस ठाण्याच्या मागील बाजूच्या वीजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली होती. या आगीत पोलिस ठाण्याच्या आवारातील २१ मोटारसायकली व एक चारचाकी मोटार जळून खाक झाल्या. या आगीची माहिती मिळताच एमआयडीसीच्या फायर ब्रिगेडने घटनास्थळी धाव घेऊन, पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.

रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत विविध अपघात व गुन्ह्यांत जप्त केलेल्या तसेच बेवारस म्हणून सापडलेल्या व चोरीच्या म्हणून जप्त केलेल्या अनेक मोटारसायकली पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस लावण्यात आल्या होत्या. या मोटारसायकली जेथे उभ्या केल्या होत्या तेथे जवळच वीजेचा खांब आहे. काल (ता. ६) सायंकाळी सहाच्या सुमारास वीजेच्या खांबावर शॉर्ट सर्किट होऊन आगीच्या ठिणग्या खाली पडल्या. त्यातून सुरवातीला एका मोटारसायकलने पेट घेतला व पुढे आग भडकत जाऊन तब्बल २१ मोटारसायकली जळून खाक झाल्या. एका गुन्ह्यात तपासासाठी आणलेली मारूती अर्टीगा (क्र. एमएच १२ एसक्यू ८२०३) ही मोटारही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यात सुमारे साडेसहा लाख रूपयांचे नूकसान झाले. 

''आग भडकल्यानंतर पोलिसांनी एमआयडीसीच्या फायर ब्रिगेडशी संपर्क साधला. फायर ब्रिगेडचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. एकसारखा पाण्याचा मारा करून त्यांनी आग आटोक्यात आणली. तथापि, एका मोटारीसह २१ दूचाकी जळून खाक झाल्या. सुदैवाने यात कुठलीही जिवीतहानी झाली नाही. पोलिस ठाण्याचे कर्मचारी माणिक बबन काळकुटे यांनी याबाबतची खबर दिली असून, पुढील तपास सहायक फौजदार मुश्ताक शेख करीत आहेत.''
- नितीन बारवकर, शिरूर बातमीदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

PSL vs IPL : पाकिस्तान करणार धरमशालाची कॉपी; PSL ला IPL सारखी झळाळी देण्यासाठी सुरू केली धडपड

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

जेपी नड्डा, अमित मालवीय यांना 'आक्षेपार्ह पोस्ट' प्रकरणी पोलिसांचे समन्स, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT