Metro 
पुणे

पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रोचे २१५ खांब पूर्ण

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये मेट्रोचे २१५ खांब बांधून पूर्ण झाले असून, आणखी ६७ खांबांसाठी पायाचे काम झाले आहे. नाशिक फाटा उड्डाण पुलाजवळील परिसर तसेच काही चौकांतील भागांमध्ये मेट्रोच्या खांबांसाठी पाया घेण्याचे काम अद्याप शिल्लक आहे.

मेट्रोच्या कामामध्ये स्थापत्यचे काम जादा वेळ घेणारे असते. त्यामध्ये खांबांसाठी पाया घेऊन त्याची उभारणी करण्याला अधिक कालावधी लागतो. गेल्या दीड वर्षात मेट्रोचे दोनशेपेक्षा अधिक खांब उभारण्यात आले. या भागातील सहा स्थानकांसाठी खांब बांधले असून, चार स्थानकांच्या पहिल्या टप्प्यातील (कॉनकोर्स लेव्हल) आर्म बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

खांबांवरील पूल (व्हायाडक्‍ट) बांधण्यासाठी तीन गर्डर लाँचरच्या साह्याने स्पॅन बसविण्यात येत आहेत. चौथा गर्डर लाँचर उभारण्यात येत असून त्याचे काम खराळवाडीपासून महापालिका भवनाच्या दिशेने लवकरच सुरू करण्यात येईल. आतापर्यंत ९२ स्पॅन पूर्ण झाले आहेत. त्यावर लोहमार्ग टाकण्याचे काम येत्या महिन्याभरात सुरू करण्यात येणार आहे. 

हॅरिस पुलाजवळ मुळा नदीच्या पात्रात चार खांबासाठी पाया घेण्यात आला असून पावसाळ्यापूर्वी पाचव्या खांबासाठी पाया घेण्यात येईल. नदीपात्रात एकूण पाच खांब असून ते पावसाळ्यापूर्वी हॅरिस पुलाच्या उंचीपर्यंत बांधण्याचे नियोजन महामेट्रोने केले आहे. पावसाळ्यामध्ये त्याची उंची आणखी साडेपाच मीटरने वाढविण्यात येईल. डिसेंबरपर्यंत या मार्गावर मेट्रो सुरू करण्याच्या उद्देशाने ही सर्व कामे वेगाने करण्यात येत असल्याचे महामेट्रोच्या सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT