Pune-Municipal 
पुणे

महापालिकेच्या वापराविना असलेल्या २१९ सदनिका सील

सकाळवृत्तसेवा

पुणे - महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने भाडेतत्त्वावर दिलेल्या सदनिका आणि व्यावसायिक गाळ्यांची थकबाकी वसूल करण्यासाठी दोन भरारी पथके स्थापन केली आहेत. या पथकांनी अवघ्या चार महिन्यांत ७० लाख ५१ हजार रुपये थकबाकी वसूल केली असून, वापराविना पडून असलेल्या २१९ सदनिका सील केल्या आहेत.

पुढील आर्थिक वर्षात उद्दिष्ट गाठण्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन विभागाने आत्तापासून तयारी सुरू केली आहे. विभागाने उभारलेल्या वास्तूंमधील व्यावसायिक गाळे आणि ‘आर सेव्हन’ या नियमांतर्गत विविध गृहप्रकल्पांमधील सदनिकाही भाडेतत्त्वावर दिल्या आहेत. यांचेही भाडे मागील काही वर्षांपासून थकले आहे. या पार्श्‍वभूमीवर मालमत्ता विभागाचे उपायुक्त राजेंद्र मुठे यांनी मागील पाच महिन्यांपासून थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम आखली आहे. त्याअंतर्गत दोन भरारी पथके स्थापन केली आहेत.

या पथकांनी पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या सदनिकांवर लक्ष केंद्रित केले आहे. आर सेव्हनअंतर्गत ताब्यात आलेल्या २९२३ सदनिकांपैकी १०५६ सदनिका भाडेतत्त्वाने दिल्या आहेत. त्यापैकी काही मोजकीच मंडळी भाडे भरत असून, अनेकांकडे थकबाकी होती. या पथकांनी नोव्हेंबरपासून फेब्रुवारीपर्यंत ६०५ सदनिका तपासल्या. त्यानंतर थकबाकीदारांना नोटीस बजावून चार महिन्यांत ७० लाख ५१ हजार रुपये वसूल केले. या मोहिमेदरम्यान भाडेकराराने दिलेल्या २१९ सदनिकांमध्ये कोणीच राहत नसल्याचे लक्षात आल्यानंतर या पथकाने या सदनिकाही सील केल्या असून, संबंधित भाडेकरूंविरोधातही कारवाई सुरू केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT