PMPMl Bus Sakal
पुणे

शिंदवणे घाटात चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले २२ प्रवाशांचे प्राण

सासवडहून उरुळी कांचन मार्गी निघालेल्या पीएमपीएल बसचा ब्रेक फेल झाला

सुवर्णा कांचन

उरुळी कांचन : सासवडहून उरुळी कांचन या मार्गी निघालेल्या पीएमपीएल बसचा शिंदवणे घाटातच ब्रेक फेल झाला. ही बाब लक्षात येताच बस चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने या ठिकाणी होणारी मोठी दुर्घटना टळली. किशोर कदम असे या पीएमपीएल बस चालकाचे नाव आहे. यावेळी या बस मध्ये एकूण २२ प्रवासी प्रवास करत होते. या प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, साधारणपणे सकाळी सात वाजता सासवडहून उरुळी कांचन या मार्गी पीएमपीएल बस ही २२ प्रवाशांना घेऊन निघाली असता शिंदवणे घाटातील मंदिराजवळ तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याचे बस चालक किशोर कदम यांच्या लक्षात आले. घाटात एका बाजूने डोंगर तर दुसऱ्या बाजूला दरी असल्याने कदम यांनी प्रसंगावधान दाखवून डोंगराच्या बाजुला बस धडकून थांबविल्याने प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. आणि प्रवाशांनी चालकाचे आभार मानले.

दरम्यान, उरुळी कांचन ते सासवड या मार्गी बससेवा सुरू करण्यासाठी प्रवाशांकडून सातत्याने मागणी होत होती. या मागणीचा पीएमपीएलचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे, माजी सनदी अधिकारी संभाजीराव शिंदे यांनी पाठपुरावा केल्याने सासवड शिंदवणे घाट मार्गे उरुळी कांचन अशी बससेवा सुरू करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT