Hospital 
पुणे

शिवसैनिकांनी दाखवून दिले, सिम्बॉयोसिस हॉस्पिटलचे 227 बेड रिकामे

बंडू दातीर

पौड (पुणे) : मुळशी तालुक्यात कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. तथापि केवळ आरोग्य कर्मचारी नसल्यामुळे लवळ्याच्या सिम्बॉयोसिस रूग्णालयातील 227 बेड रिकामे पडले आहेत. याबाबत युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश बलकवडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेऊन येथे जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा कामाला लावावी, अशी मागणी केली आहे.

मुळशी तालुक्यात 7 सप्टेंबरपर्यंत 1281 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी 225 रूग्णांवर सध्या उपचार चालू असून, 36 जणांचा मृत्यू झाला आहे. कासारआंबोली येथील राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा, हिंजवडीतील कोव्हीड सेंटर आणि विप्रो हॉस्पिटलमध्ये मुळशी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्यावतीने कोरोनाबाधितांवर उपचार चालू आहेत. तर, लवळ्याच्या सिम्बॉयोसिस हॉस्पिटलमध्ये त्यांच्या यंत्रणेमार्फत रूग्णांवर उपचार केले जात आहेत.

सिम्बॉयोसिस रूग्णालयाची 470 बेडची क्षमता आहे. त्यापैकी सध्या 243 बेड कोरोनाच्या उपचाराकामी ताब्यात घेतलेले आहे. तर, केवळ आरोग्य अधिकारी, कर्मचारी नसल्यामुळे 227 बेड रिकाणे आहेत. ही माहिती मिळताच युवासेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश बलकवडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले यांची भेट घेतली. त्यांना सिम्बॉयोसिसमधील रिकाम्या बेडबाबतची माहिती दिली. या ठिकाणी जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा कामाला लावावी, अशी बलकवडे यांनी मागणी केली. त्यावेळी घुले यांनीही सकारात्मकता दर्शवित गटविकास अधिकारी संदीप जठार यांच्याकडे याबाबतचा अहवाल मागितला आहे.

मुळशी तालुक्यातील तीन्ही कोव्हीड केअर सेंटरमध्ये जिल्हा परिषदेकडून तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी कार्यरत आहेत. सिम्बॉयोसिसमध्ये 227 बेड रिकामे आहेत. याबाबत या हॉस्पिटलशी तातडीने संपर्क साधून किती वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी यांची गरज आहे याची माहिती घेऊन ती जिल्हा परिषदेला कळविली आहे.
 - संदीप जठार, गटविकास अधिकारी, मुळशी 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : नसरापूरमध्ये क्रौर्याची परिसीमा! तोंडात पायमोजा कोंबून अत्याचार, चिमुकलीच्या छातीवर जखमांच्या खुणा; शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा

SRPF Bharti Scam: SRPF भरती परीक्षेत मोठा घोटाळा? ८५ प्रश्न जसेच्या तसे सराव संचातून आल्याने खळबळ, भरती परीक्षेवर प्रश्नचिन्ह!

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण! Mahindra-PNB शेअर्स चर्चेत; कारण काय? बाजार आणखी कोसळणार?

Latest Marathi News Live Update : नसरापूर अत्याचारप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेणार भेट

‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या कमाईमध्ये सोमवारी घट, ४ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT