पुणे

पुणे शहरात २३ धोकादायक झाडे 

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरात वेगवेगळ्या भागात जवळपास २३ झाडे आणि त्यांच्या फांद्या वारा आणि पावसामुळे कोसळण्याची शक्‍यता आहे. यामुळे पादचारी आणि वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत उपाययोजना करण्याकडे महापालिकेची यंत्रणा पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. या कामाची जबाबदारी वृक्ष प्राधिकरण समितीची असल्याचे महापालिकेचा उद्यान विभाग आणि अग्निशमन दल यापासून लांब राहात आहे. त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्‍न नागरिकांसमोर उभा राहिला आहे.  

शहरातील प्रमुख रस्त्यांसह लोकवस्तीतही धोकादायक झाडे आहेत. मात्र, प्रस्ताव आणि त्यावरील प्रशासकीय कार्यवाहीपुरतेच मर्यादित असलेले वृक्ष प्राधिकरण ही बाब गंभीर्याने घेत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांच्या तक्रारी येऊनही प्राधिकरण निर्णय घेत नसल्याने पावसात झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. सहकारनगरमधील संतनगरसारख्या गजबजलेल्या भागात चार दिवसांपूर्वी झाड कोसळले. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. 

या झाडाच्या फांद्या तोडल्या नसल्याने ते कोसळल्याचे रहिवाशांनी सांगितले. विशेष म्हणजे, येथील सत्ताधारी भाजपच्या नगरसेविक साईदिशा माने यांनी तक्रार केली होती, तरीही एकाही यंत्रणेने दखल घेतली नाही. जेव्हा झाड पडले तेव्हाही अग्निशमन दलाची यंत्रणा पोचली नसल्याने माने यांच्या कार्यकर्त्यांनीच झाड बाजूला केले.

वाहनांची जास्त वर्दळ असलेल्या रस्त्यांलगतच्या झाडांच्या फांद्या लोंबकळत असून, त्या मोठ्या प्रमाणात विस्तारल्याच्या तक्रारी आहेत. काही भागात तर फांद्यांच्या ओझ्याने झाडे कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. पावसाआधी झाडांच्या फांद्या कापण्याची कामे करण्यात येतील, असे संबंधित विभागांकडून सांगण्यात आले. परंतु, काही मोजक्‍याच ठिकाणी कामे केल्याचे दिसून आले आहे. तक्रार करूनही उपाययोजना केल्या जात नसल्याने धोकादायक झाडांमुळे दुर्घटना घडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

रस्ते आणि नागरी वस्तीतील झाडांबाबतच्या तक्रारींची बैठकीत तातडीने चर्चा करून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या जातात. तसेच, खबरदारी म्हणून शहरात कामे करण्यात आली आहेत. ज्या भागातील नागरिकांच्या तक्रारी आहेत, त्या सोडविण्यात येतील.
- आदित्य माळवे, नगरसेवक व वृक्षप्राधिकरण समितीचे सदस्य 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT