23 thousand 771 farmers registered for crop insurance in Ambegaon pune Sakal
पुणे

Pune : आंबेगाव तालुक्यात २३ हजार ७७१ शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी केली नोंदणी

खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत आंबेगाव तालुक्यात शुक्रवार (ता.१९) अखेर २३ हजार ७७१ शेतकऱ्यांनी प्रतिअर्ज रक्कम एक रुपया भरून पोर्टलवर नोंदणी केली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ यांनी दिली.

नवनाथ भेके निरगुडसर

निरगुडसर : खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत आंबेगाव तालुक्यात शुक्रवार (ता.१९) अखेर २३ हजार ७७१ शेतकऱ्यांनी प्रतिअर्ज रक्कम एक रुपया भरून पोर्टलवर नोंदणी केली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी नरेंद्र वेताळ यांनी दिली.

मागील वर्षी आंबेगाव तालुक्यातील १९ हजार शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळाला असून,सुमारे ४ कोटी ४७ लाख रुपये विमा भरपाई मिळाली आहे,या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत वाढविण्यात आली असून ३१ जुलैपर्यंत करण्यात आली असून पीक विमा काढण्यासाठी तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन आंबेगाव तालुका कृषी अधिकारी आंबेगाव नरेंद्र वेताळ यांनी केले आहे.

आंबेगाव तालुक्यात सुमारे ३० हजार शेतकरी नोंदणी करून योजनेत सहभागी होतील,असा अंदाज कृषी विभागाकडून व्यक्त केला जात आहे.शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेऊन पीकविमा काढून सुरक्षा कवच मिळवावे.खरिपातील पिकासाठी ही विमा योजना असून,नैसर्गिक आपत्ती,कीड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळते.

आपले सरकार सेवा केंद्र सीएससी धारकांस विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज ४० रुपये देत असल्याने शेतकऱ्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. बिगर कर्जदार शेतकरी आपल्या पिकांचा विमा जवळच्या राष्ट्रीयकृत बँका,सहकारी बँका,प्राथमिक कृषी सहकारी सोसायटी आदी वित्तीय संस्थेमार्फत घेऊ शकतात.प्रादेशिक ग्रामीण बँका, आपले सरकार सेवा केंद्र (सीएससी)

https:// pmfby.gov.in/farmerLogin वेबसाइट लिंकद्वारे स्वतःच्या पीक विमा नोंदणी करू शकतात. योजनेसंबंधित अधिक माहितीसाठी,कृषी रक्षक पोर्टल हेल्पलाइन (KRPH) क्रमांक : ९१४४४७ वर उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिलचा हप्ता जमा झाला नाही, काळजी नसावी! कधी जमा होणार असे करा चेक?

सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ, ३ दिवसात ३ रुपयांनी झाला महाग

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा तर कोकणात पावसाचा इशारा

‘मामाच्या गोव्याला जाऊया’ चे ठेका धरायला लावणारे टायटल साँग प्रदर्शित; अवधूत गुप्तेंच्या आवाजात स्वरबद्ध

Maharashtra Voter List: राज्यात एक कोटी मतदार वगळणार ? 'एसआयआर'मध्ये मुंबई, ठाणे, पुण्यात सर्वाधिक मतदार बाद होण्याचा अंदाज!

SCROLL FOR NEXT