पुणे

पुणे महापालिकेत नव्या वर्षात 23 गावांचा समावेश 

सकाळवृत्तसेवा

पुणे - नव्या वर्षात म्हणजे येत्या जानेवारी महिन्यात हद्दीलगतच्या 23 गावांचा महापालिकेत समावेश होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. गावे घेण्याबाबतच्या प्रस्तावावर राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी झाल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भातील घोषणा 15 दिवसांत होण्याची शक्‍यता आहे. गावांचा समावेश होण्याच्या शक्‍यतेने महापालिकेनेही प्राथमिक तयारी चालविली आहे. 

महापालिकेच्या हद्दीलगतची 34 गावे महापालिकेत समावेश घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. त्यावर कार्यवाही करताना पहिल्या टप्प्यांत 11 गावांचा समावेश झाला. मात्र, उर्वरित गावेही टप्प्याटप्प्याने महापालिकेत घेण्यात येतील, असे शपथपत्र युती सरकारच्या काळात न्यायालयात सादर केले होते. मात्र ही गावे महापालिकेत घेण्याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस विशेषत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेतला आहे. गावांचा समावेश करण्याबाबतचा अभिप्रायही जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यानंतर लगेचच ही गावे समाविष्ट होतील, असे सांगण्यात येत होते. त्यानुसार प्रस्ताव मंजूर करून पुढील महिन्यांत निर्णय जाहीर केला जाऊ शकतो, असेही सांगण्यात आले. दरम्यान, या गावांच्या विकासासाठी पहिल्या टप्प्यातच 10 हजार कोटी रुपयांच्या निधीची गरज राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT