Crime News esakal
पुणे

Pune Crime : पुण्यात चाललंय तरी काय! लग्नाला नकार दिला म्हणून महिलेने पैसे देऊन केलं तरूणाचं अपहरण

रोहित कणसे

पुण्यातील सदाशिव पेठेत काल एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकारानंतर राज्यात खळबळ उडल्याचं पाहायला मिळालं. यानंतर पुणे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभिर बनत चालल्याची टीका विरोधकांकडून राज्य सरकारवर करण्यात येत आहे. यादरम्यान लग्न करण्यास नकार दिल्यामुळे एका महिलेने तरुणाचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर येथील २३ वर्षीय तरुण गुजरातमधील वापी येथे खासगी कंपनीत नोकरी करतो. त्याचा भाऊ पुण्यातील एनडीए गेट रस्ता परिसरात राहतो. दरम्यान या त्याचे २० वर्षीय विवाहित तरुणीशी प्रेमसंबंध जुळले.

यादरम्यान तरुणाच्या आई-वडिलांनी त्याचे लग्न ठरवण्यासाठी सोलापूरला बोलावून घेतल्याने विवाहित महिलीा संतापली, तिने चक्क प्रोफेशनल अपहरणकर्त्यांना पैसे देऊन. एनडीए रस्त्यावरील कोढवे धावडे परिसरातून चार दिवसांपूर्वी महिलेसह तिच्या साथीदारांनी त्या तरुणाचे अपहरण केले. एनडीए रस्त्यावरील कोढवे धावडे परिसरातून चार दिवसांपूर्वी या तरुणाला नेण्यात आले.

अखेर गुजरातमध्ये सापडला तरूण

पोलिसांनी या प्रकरणी तपासाटी चाके फिरवली. पोलिसांना आरोपी गुजरातमधील वापी परिसरात असल्याची माहिती मिळली. यानंतर वापी येथे जाऊन एका हॉटेलमध्ये छापा टाकून तरुणाची सुटका करण्यात आली.

पोलिस तपासात या महिलेने तरुणाचे अपहण करण्यासाठी 2 जणांना सुपारी दिल्याचे समोर आले. दरम्यान या प्रकरणी एका महिलेसह प्रथमेश यादव, अक्षय कोळी यांना अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT