DAUND
DAUND  
पुणे

अतिक्रमणे वाचविण्यासाठी येथे नगरपालिकेचाच पुढाकार

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : एरवी नगरपालिकेकडून अतिक्रमणे हटविले जातात, परंतु दौंड नगरपालिकेने सध्या शहरात जणू अतिक्रमण वाचवा मोहिम सुरू केली आहे. रस्त्यांची कामे करताना अतिक्रमणे वाचविण्यासाठी झिगझॅग आकाराच्या गटारी बांधल्या जात आहेत. 

दौंड शहरात सध्या हुतात्मा चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रस्त्याचे काम संथ गतीने सुरू आहे. रस्त्याच्या कामापूर्वी दुतर्फा गटारी बांधल्या जात आहेत. गटारी बांधताना सेंट्रल बॅंक समोरील अतिक्रमणे वाचविण्यासाठी रस्त्याखाली पाइप टाकण्यात आला. नगरपालिका कार्यालयासमोर गटाराला जिन्याचा अडथळा होता, परंतु तो हटविण्याची तसदी न घेता नगरपालिकेनेच झिगझॅग गटार बांधली आहे. पुढे एका रूग्णालयाने रस्त्यालगत ठेवलेले जनरेटरचे अतिक्रमण वाचविण्यासाठी 30 फूट लांब गटार वळविण्यात आली आहे. जिल्हा बॅंक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान देखील गटार वळविण्यात आली आहे.

हे सर्व करताना नैसर्गिक उतार आणि गटारीच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्‍यक खबरदारी घेण्यात आलेली नाही. 

जुना शहा दवाखाना ते कल्पलता हॉटेल दरम्यान देखील महसूल खात्याच्या जागेतील अतिक्रमण करून बांधण्यात आलेले उप कारागृह स्वच्छतागृह न पाडता गटार वळविण्यात आली आहे. रोटरी क्‍लबने नगरपालिकेची परवानगी घेऊन बांधलेले महिला व पुरूषांसाठीचे बांधलेले स्वच्छतागृह रस्त्याच्या कामासाठी पाडण्यात आले, परंतु उप कारागृहाच्या स्वच्छतागृहाला हात लावण्यात आला नाही. 
कुरकुंभ मोरी ते महात्मा गांधी चौक दरम्यान देखील मनमानी पद्धतीने काही ठिकाणी दुतर्फा, तर काही ठिकाणी एका बाजूला गटार बांधण्यात आले आहे. ओटे, भिंती आणि अन्य अतिक्रमणे वाचविण्यासाठी या रस्त्यावर देखील झिगझॅग आकाराच्या गटारी बांधण्यात आल्या आहेत. आर्थिक स्तर, राजकीय जवळीक आणि उपद्रव करू पाहणाऱ्यांची अतिक्रमणे वाचविली जात आहेत. 

याबबात मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, ""डॉ. आंबेडकर चौकातील गटाराचे बांधकाम दुरूस्त केले जाईल.'' 

सगळे चिडीचूप 
अतिक्रमणांविषयी सत्ताधारी व विरोधक चिडीचूप आहेत. एरवी प्रभागात विकासकामे झाली तर "मी केली ' असे मिरवणारे अतिक्रमणे हटविण्याविषयी मात्र चिडीचूप आहेत. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Pune Loksabha Constituency : प्रांतिक तैलिक महासभेचा भाजपचे उमेदवार मोहोळ यांना पाठिंबा जाहीर

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : व्होट बँकेसाठी काँग्रेसने राम मंदिराचा अपमान केला - पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT