पुणे

बेशिस्त 24000 वाहनचालकांवर कारवाई 

संदीप घिसे

पिंपरी - पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांच्या आदेशानुसार बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या महिनाभरात पोलिसांनी तब्बल 24 हजार 103 जणांवर कारवाईस सुरवात केली आहे. यामुळे आगामी काळात वाहतुकीला शिस्त लागल्याशिवाय राहणार नाही. 

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा विडा आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी उचलला आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले. चौकीत नको तर चौकात बसा, असा सल्लाही त्यांनी पोलिसांना दिला. चौकात आलेल्या पोलिसांनी सिग्नल जंपिंग, ट्रिपल सीट, मोबाईल टॉकिंग, नो-एन्ट्री, नो-पार्किंग असे नियमभंग करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांच्या वाहनांचे नंबर टिपून ते वाहतूक पोलिसांकडे देण्यास सांगितले. यामुळे महिनाभरात तब्बल 24 हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. त्यात धोकादायक पद्धतीने नो-एन्ट्रीतून वाहन चालविणाऱ्यांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. 

अशी आहे कारवाईची पद्धत 
चौकात उभे असलेले पोलिस नियमभंग करणाऱ्या वाहनचालकाचा नंबर टिपून तो वाहतूक पोलिसांकडे देतात. वाहतूक पोलिस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहन मालकाचे नाव पत्ता मिळवितात आणि त्याप्रमाणे संबंधितांना नोटीस पाठवून दोनशे ते बाराशे रुपयांपर्यंत दंड वसूल करतात. जे वाहन मालक दंड भरण्यास नकार देतात त्यांच्यावर खटला दाखल करून न्यायालयात पाठविण्यात येते, अशी माहिती वाहतूक विभागाचे प्रशासन अधिकारी पोलिस निरीक्षक पांडुरंग गोफणे यांनी दिली. 

इन्फोन्समेंट सेलची स्थापना 
बेशिस्त वाहनचालकांवरील कारवाईचा वेग वाढविण्यासाठी पोलिस आयुक्‍तांनी खास इन्फोन्समेंट सेलची स्थापना केली आहे. वाकड येथील भुजबळ चौकातील पुलाखाली या सेलचे कार्यालय कार्यान्वित केले आहे. 

पिंपरी पोलिस ठाणे आघाडीवर 
बेशिस्त वाहनचालकांवरील कारवाईत पिंपरी पोलिस ठाणे आघाडीवर आहे. या पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तब्बल 13 हजार 73 बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई केली. याशिवाय कलम 279 प्रमाणे 118 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी न्यायालयाने 81 जणांना शिक्षा सुनावल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी दिली. 

गुन्हा वाहनांची संख्या 
भा.द.वि.279 प्रमाणे कारवाई 384 
सिग्नल जंपिंग 3,365 
ट्रिपल सीट 3,845 
मोबाईल टॉकिंग 1,248 
नो-एन्ट्री 10,480 
नो-पार्किंग 4,781 
---------------------- 
24,103 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'तू माझ्यासाठी सर्वात मौल्यवान...'; कतरिना कैफची पोस्ट चर्चेत, मुलगा विहानची सुद्धा दाखवली झलक

FIFA World Cup 2026 Final: अर्जेंटिनाचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य! फायनलआधी रॉड्रीने उघड केला स्पेनच्या विजयाचा सीक्रेट प्लॅन

Live Updates Marathi: एकनाथ शिंदे यांचा चंद्रभागेत नौकविहार

Maharashtrian Recipe: तिखट खायला आवडतं? घरीच बनवा झणझणीत,सुकी लाल मिरची चटणी!

Pune News: कॅनॉलच्या कठड्यावर लटकलेल्या चारचाकी गाडीतील चालकाला उरुळी कांचन पोलिसांनी शिताफीने सुखरूप बाहेर काढले

SCROLL FOR NEXT