Bank-Account sakal
पुणे

पुणे जिल्ह्यातील २४७ गावांमध्ये बॅंक खात्यासाठी उद्या मेळावे

पुणे जिल्ह्यातील नागरिकांचे बॅंकेत खाते उघडण्यासाठी येत्या शनिवारी (ता. २९) २४७ गावांमध्ये बॅंक खाते उघडण्यासाठी खास मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे जिल्ह्यातील नागरिकांचे बॅंकेत खाते उघडण्यासाठी येत्या शनिवारी (ता. २९) २४७ गावांमध्ये बॅंक खाते उघडण्यासाठी खास मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे - पुणे जिल्ह्यातील नागरिकांचे बॅंकेत खाते उघडण्यासाठी येत्या शनिवारी (ता. २९) २४७ गावांमध्ये बॅंक खाते उघडण्यासाठी खास मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यांमध्ये खाते उघडण्याबरोबरच किसान क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत शेतीपूरक व्यावसासायासाठी आणि मुद्रा योजनेंतर्गत व्यावसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्यावतीने जिल्ह्यात आर्थिक समावेशनातून सशक्तीकरण या प्रकल्पाची अंमलबजावणी खास मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे जिल्हा अग्रणी बँक व जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, सहकारी व ग्रामीण बँकांच्या माध्यमातून या खास मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे मुख्य व्यवस्थापक श्रीकांत कारेगांवकर यांनी दिली.

जिल्ह्यातील सुमारे २१ बँका, जिल्हा परिषद व राज्य सरकारच्या महसूल, पशुसंवर्धन, कृषी, मत्स्य आदी विभाग आणि गावपातळीवरील तलाठी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्त्या, कृषी सहाय्यक या मेळावा आयोजनाच्या मोहिमेत सहभागी होणार आहेत. या मोहिमेअंतर्गत पंतप्रधान जनधन बचत खाते उघडणे आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ देण्यासाठीच्या विविध योजनांमध्ये नागरिकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पीक कर्जाबरोबरच दुग्ध, पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन व मत्स्यव्यवसाय आदी शेतीपूरक व्यवसायांसाठी खेळते भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी आणि मुद्रा योजनेअंतर्गत बेरोजगार व महिला बचत गटांना खेळते भांडवल व व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठीचे अर्ज स्वीकारले जाणार असल्याचेही कारेगांवकर यांनी सांगितले.

नोव्हेंबर महिन्यात होणारे मेळावे (संख्या)

- ५ नोव्हेंबर - २१५ गावे

- १२ नोव्हेंबर - १८९ गावे

- १९ नोव्हेंबर - १८२ गावे

- २६ नोव्हेंबर - १७६ गावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Website: मराठी डिजिटल बातम्यांमध्ये 'सकाळ डिजिटल' नंबर १; साडे सहा कोटींहून अधिक वाचकांचा विश्वास

Hapus Mango Price Rise : हवामानामुळे 'फळांचा राजा' महागला; उत्पादनात 30 टक्क्यांनी घट, भावात 25 टक्क्यांची वाढ

Maharashtra Council Election : काँग्रेस विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार नाही, अंबादास दानवेंचा मार्ग मोकळा; निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

IPL 2026: रियान परागला BCCI ने सुनावली शिक्षा! ड्रेसिंग रुममध्ये व्हॅपिंग करणं पडलं महागात

एकुलत्या एक मुलाच्या निधनानंतर आईने सोडलं ८० कोटींच्या बंगल्यावर पाणी, झोपडीत काढतेय अखेरचे दिवस

SCROLL FOR NEXT