पुणे

आर्थिक स्थिती सुधारल्याने २५ बँका ‘सॅफ’ निर्बंधमुक्त

CD

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २१ : रिझर्व्ह बँकेच्या सुपरवायझरी अ‍ॅक्शन फ्रेमवर्क (सॅफ) अंतर्गत निर्बंध असलेल्या २१२ पैकी २५ बँकांची आर्थिक स्थिती सुधारल्यामुळे त्यांच्यावरील निर्बंध हटविले आहेत. बँकांसह सर्वांच्याच सांघिक प्रयत्न आणि नियोजनातून उर्वरित बँकांवरील निर्बंधही हटतील, असा विश्‍वास सहकार आयुक्त शैलेश कोतमिरे यांनी व्यक्त केला.
पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लिमिटेड या संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात कोतमिरे बोलत होते. या वेळी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष मोहिते, उपाध्यक्ष ॲड. साहेबराव टकले व अन्य संचालक मंडळ आणि विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रसंगी संस्थेचे ‘बँकिंग आशय अभिप्राय’ या मासिकाच्या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
कोतमिरे म्हणाले, ‘‘राज्यात ४३७ नागरी सहकारी बँका असून, २१२ नागरी सहकारी बँकांवर ‘सॅफ’चे निर्बंध आहेत. ही गोष्ट भूषणावह नाही. अशा बँकांना निर्बंधातून बाहेर काढण्यासाठी आम्ही विभागवार बैठका घेऊन पालक अधिकारी म्हणून सहकार अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. वेळोवेळी आढावे घेतले. त्यातूनच २५ बँका या ‘सॅफ’च्या निर्बंधातून बाहेर आणणे शक्य झाले. बँकांच्या फेडरेशननेही यामध्ये महत्त्वाची भूमिका घेऊन काम करण्याची आवश्यकता आहे.’’
सहकारी बँका जोपर्यंत छोट्या कर्जदारांपर्यंत पोहचून बँकिंग व्यवसाय करणार नाहीत, तोपर्यंत अडचणी कमी होणार नाहीत. कारण, आपण बँकिंगचा मूळ व्यवसाय विसरून गेलो आहोत. मोठ्या ठेवीदारांनी आपल्या ठेवी काढल्या, तर आज बँकिंगची अवस्था काय होईल? याचा सर्वांनी विचार करून छोटे कर्जदार, छोटे ठेवीदार मिळवायला हवेत. सूक्ष्म कर्जपुरवठा तळागाळापर्यंत करून ग्रामीण भागातही व्यवसाय वाढीची गरज आहे. आज चांगले कर्जदार मिळविणे हे बँकिंग क्षेत्रापुढे मोठे आव्हान आहे. त्यादृष्टिने स्पर्धात्मक स्थितीत काळाची पावले ओळखून व्यवसायभिमुखता बाळगण्याची आवश्यकता आहे. ग्राहक बँकेत येतील, अशी स्थिती आता राहिली नसून, लोकांपर्यंत जाऊन मार्केटिंग करणे आता आवश्यक झाले आहे, असेही ते म्हणाले.
अध्यक्ष अ‍ॅड. मोहिते म्हणाले, ‘‘पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर करार करून पदविका अभ्यासक्रम तयार करण्याचे काम पूर्ण केले आहे. जुलैपासून त्याची सुरुवात होणार आहे. दरवर्षी ३० विद्यार्थी पदवीकेसाठी प्रवेश घेऊ शकणार आहेत.’’
बँक्स असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कारंजकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष ॲड. साहेबराव टकले यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Drug Injections: हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; सराईत गुन्हेगार अभिषेक भडंगे अटक, ८२ बाटल्या जप्त

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Latest Marathi News Live Update : भाषांतर करण्यासाठी आलेले प्रश्न हवालदारने इतर आरोपींच्या माध्यमातून पोहचवले

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT