25 lakh fraud with garage operator cyber thief crime police pune sakal
पुणे

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून गॅरेज चालकाची 25 लाखाची फसवणूक

सायबर चोरट्यांनी गॅरेज चालकास त्याच्या समाजमाध्यमांवरील दर्शक पसंती वाढवून देतो असे सांगत त्यास गंडा घातला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : फेसबुक, ट्विटरवर लाईक्‍स, फॉलोअर्स वाढवून घेण्याच्या नादात एका गॅरेज चालकाने तब्बल 25 लाख 50 हजार रुपये गमावले. सायबर चोरट्यांनी गॅरेज चालकास त्याच्या समाजमाध्यमांवरील दर्शक पसंती वाढवून देतो असे सांगत त्यास गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत औंध येथे राहणाऱ्या एका 38 वर्षीय गॅरेज चालकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे गॅरेजचालक असून ते औंध परिसरात वास्तव्यास आहेत. आरोपींनी गॅरेज चालकास समाजमाध्यमातून संदेश पाठविला होता.

त्यामध्ये समाजमाध्यमातील जाहिरातीच्या ध्वनीचित्रफितींना दर्शक पसंती मिळवून (लाइक्‍स) दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी संदेशाव्दारे दाखविले होते. चोरट्यांनी दिलेल्या लिंकवर माहिती भरून दिल्यानंतर गॅरेज चालकास प्रारंभी चोरट्यांनी काही रक्कम देत त्याचा विश्‍वास संपादन केला.

त्यानंतर त्यास आणखी पैसे देण्याचे आमिष दाखवून दाखविले. त्यासाठी गॅरेजचालकास काही रक्कम भरण्यास सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी गॅरेजचालकास आमिष दाखवून वेळोवेळी 25 लाख 50 हजार रुपये घेतले. गॅरेजचालकाने ऑनलाइन माध्यमाद्वारे चोरट्यांनी दिलेल्या बॅंक खात्यात पैसे पाठविले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने पोलिसांकडे धाव घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : लव्हस्टोरीतून एमपीएससीचा पेपर फुटला; प्रेमासाठी पेपर फोडल्याने यंत्रणा खडबडून जागी, असं काय घडलं?

गोड साखरेचा कडू इतिहास! युरोपातील राजे-महाराजे 'या' खास कारणासाठी करायचे साखरेचा वापर

कुकू कोहलींच्या अंत्ययात्रेत लेकीनं दिला खांदा; वडिलांना अखेरचा निरोप देताना करिश्मा कोहली भावूक

Panchganga Pollution: ‘एसटीपी’ उभारणीच्या दिरंगाईचा अहवाल द्या; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडेंचे आदेश; कोल्हापुरात येऊन पाहणी करणार

वैभव सूर्यवंशीच्या टेस्ट ड्रीमला मोठा धक्का? राहुल द्रविड यांनी सांगितली मोठी अडचण; म्हणाले, ‘अजून बराच पल्ला गाठायचा आहे’

SCROLL FOR NEXT