प्रधानमंत्री आवास योजना
प्रधानमंत्री आवास योजना esakal
पुणे

प्रधानमंत्री आवास योजनेसाठी २७ कोटीचे वर्गीकरण

सकाळ वृत्तसेवा

पुणे: प्रधानमंत्री आवास योजनेच्या कामासाठी महापालिकेने केलेली तरतूद अपुरी पडत असल्याने २७ कोटी ६८ लाख रुपये वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरू असलेल्या गृह प्रकल्पांच्या बांधकामाला पुरेसा निधी उपलब्ध झाला आहे. आज या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली, असे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.

खराडी, वडगाव खुर्द येथे प्रत्येकी एक आणि हडपसर येथे तीन असे पाच गृह प्रकल्प बांधले जात आहेत. यामध्ये २ हजार ९१८ सदनिका असणार आहेत. त्यासाठी ७० कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली होती. त्यापैकी ६ जानेवारी अखेर सुमारे ६२ कोटी ८१ लाख रुपये रक्कम खर्ची पडली आहे. हे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी चालू आर्थिक वर्षात आणखी ३२ कोटी रुपयांची तरतूद आवश्‍यक आहे. त्यासाठी नदी सुधारणा प्रकल्पातील २० कोटी आणि शहर अभियंता कार्यालयाकडे उपलब्ध असणाऱ्या १० कोटी ९३ लाख रुपयांच्या तरतुदीपैकी ७ कोटी ६८ लाख रुपयांची रक्कम वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT