Tax
Tax 
पुणे

पुणे जिल्ह्यात २७१ कोटी कर गोळा

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यात यंदा ग्रामपंचायत करापोटी २७१ कोटी ६८ लाख दोन हजार रुपयांची वसुली झाली आहे. यामध्ये २३३ कोटी २५ लाख ३८ हजार रुपयांच्या घरपट्टीचा, तर ३८ कोटी १२ लाख ६४ हजार रुपयांच्या पाणीपट्टीचा समावेश आहे. ग्रामपंचायत कर वसुलीचे हे प्रमाण ८०.५८ टक्के आहे.

गावांच्या विकासासाठी निधी उपलब्ध व्हावा आणि गावांना पायाभूत सुविधा निर्माण करता याव्यात म्हणून पंचायतराज संस्थांना विविध प्रकारच्या कर वसुलीचे अधिकार देण्यात आले आहेत. यानुसार ग्रामपंचायतींसाठी घरपट्टी आणि पाणीपट्टी हे दोन कर खूप महत्त्वपूर्ण असतात. या दोन्ही करांच्या वसुलीवरच गावांच्या विकासाचे भवितव्य अवलंबून असते. जिल्ह्यातील ग्रामपंचायत कराची मार्च २०१८ अखेर ५३ कोटी २४ लाख ३५ हजार रुपयांची थकबाकी होती. त्यात १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या आर्थिक वर्षातील २८७ कोटी ९० लाख ८० हजार रुपयांची भर पडली. यानुसार ३३२ कोटी ६८ लाख ३६ हजार रुपयांच्या कर वसुलीचे आव्हान ग्रामपंचायत विभागापुढे होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virtual Campaign: अटक केलेल्या राजकीय नेत्यांना व्हर्च्युअल प्रचाराची परवनगी मागणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

Goldy Brar Death: सिद्धू मूसवाला हत्याकांडाच्या मास्टरमाईंडची अमेरिकेत गोळ्या झाडून हत्या

Bumble : आता 'लेडीज फर्स्ट' नाही, तर पुरूषांनाही मिळणार समान संधी.. बम्बल डेटिंग अ‍ॅपने केली मोठी घोषणा!

Salman Khan : गोळीबार प्रकरणातील आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू ; गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा केला होता प्रयत्न !

China Highway Collapsed: चीनमध्ये भीषण दुर्घटना! हायवे कोसळल्यानं 19 ठार, डझनभर जखमी

SCROLL FOR NEXT