corona1 
पुणे

आंबेगाव तालुक्यात या कारणामुळे वाढलाय कोरोनाचा धोका 

चंद्रकांत घोडेकर

घोडेगाव (पुणे) : आंबेगाव तालुक्यात कोरोबाधित रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 24 तासांत 28 रुग्ण आढळून आले आहेत. आता एकूण बाधित रुग्ण संख्या ३९३ वर पोहोचली आहे. त्यातील २५४ रूग्ण बरे झाले असून, १३१  रूग्णांवर उपचार चालू आहे. काळजी न घेतल्यामुळे एकाच घरातील पाच ते सहा व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याचे आढळून आले आहे. उपचारादरम्यान आतापर्यंत आठ व्यक्तिंचा मृत्यू झाला असल्याची माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी दिली.    

आळंदीत चोर पावलांनी वशिल्याचे माउली दर्शन
    
आंबेगाव तालुक्यात गुरूवारी (ता. ६) रात्री १६ रूग्ण आढळले. यामध्ये मंचरला ५ जण, चास व पिंपळगाव येथे प्रत्येकी दोन, शिनोली, मेंगडेवाडी, निघोटवाडी, वडगावपीर, घोडेगाव, साल, खडकवाडी येथे प्रत्येकी एक. तसेच, शुक्रवारी (ता. ७) १२ जणांचा पॉझिटीव्ह रिपोर्ट आला. यात जवळे येथील ७ जण, चास येथे २ जण, तर पेठ, अवसरी, मंचर येथे प्रत्येकी एक, असे एकूण चोविस तासांत २८ रूग्ण आढळून आले. यातील बहुतेक रूग्ण पहिल्या रूग्णांच्या संपर्कातील आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. तर, अवसरी, भीमाशंकर आयुर्वेद मंचर, पिंपरी, तळेगाव, वडगाव मावळ, पुणे या हॉस्पिटमध्ये १३१ जणांवर उपचार सुरू आहेत.    

या विद्यार्थ्यांसाठी आहे लष्करात संधी
    
नागरिकांनी महत्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. बाहेर पडताना मास्कचा वापर करावा. होम क्वारंटाइन होण्यापेक्षा सेंटरमध्ये नागरिकांनी भरती व्हावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. विनाकारण फिरणाऱ्यांना  पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा सहायक पोलिस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

Pune Ahilyanagar Road: वाघोली गणेश विसर्जन २०२६; पुणे-अहिल्यानगर रोडवरील वाहतूक बदल, पर्यायी मार्ग आणि बाजार बंदची माहिती

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

Indian Economy: अर्थव्यवस्थेला नवा वेग

SCROLL FOR NEXT