पुणे

अठ्ठावीस वर्षानंतर शाळेच्या जागवल्या आठवणी

CD

ANR26B03182
अनगर ः येथील (कै.) शंकरराव बाजीराव पाटील विद्यालयात २८ वर्षांनंतर झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात सहभागी झालेले माजी विद्यार्थी, शिक्षक व मान्यवर.

२८ वर्षांनंतर शाळेच्या प्रांगणात रंगल्या आठवणी
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात; जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीने आनंद

सकाळ वृत्तसेवा
अनगर, ता. १६ : तब्बल २८ वर्षांनंतर एकाच वर्गात शिकलेले मित्र-मैत्रिणी पुन्हा शाळेच्या प्रांगणात एकत्र आले. बालपणीच्या आठवणी, शाळेतील गंमतीजमती आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांना उजाळा देत (कै.) शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.

स्वर्गीय लोकनेते बाबुराव पाटील अनगरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांचे माजी विद्यार्थ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. चंद्रकांत ढोले अध्यक्षस्थानी होते.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी मनोगतातून शाळेविषयीच्या भावना व्यक्त केल्या. २८ वर्षांनंतर पुन्हा शाळेत येण्याचा आनंद, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शालेय जीवनातील अविस्मरणीय प्रसंग सांगताना अनेकजण भावूक झाले.
यावेळी माजी प्राचार्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या मेळाव्यामुळे जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटीचा आनंद द्विगुणित झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
प्रसंगी प्राचार्य महादेव चोपडे, माजी मुख्याध्यापक विश्वजीत लटके, दत्तात्रय गोडाळे, उपप्राचार्य माधव खरात, पर्यवेक्षक राजेंद्र डोके, सेवानिवृत्त शिक्षिका शशिकला कोष्टी, सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक सीताराम बोराडे, पर्यवेक्षक चंद्रकांत यावलकर, संभाजी बोडके, रमेश चव्हाण, गोरख गायकवाड, सोमनाथ ढोले, बजरंग पाचपुंड, महादेव पवार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Helicopter Glitch : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड; पंढरपूर दौऱ्यात परतीच्या प्रवासाआधीच मोठी धावपळ

Muslim Population: 2035 पर्यंत ख्रिश्चन धर्माला मागे टाकून इस्लाम सर्वात मोठा धर्म बनणार? प्यू रिसर्च सेंटरचा अहवाल; भारतात काय परिस्थिती असेल?

Rickshaw Driver Agitation : रिक्षा संघटना एकवटल्या! बाईक, टॅक्सीविरोधात सोमवारपासून रिक्षाचालकांचे आंदोलन, परिवहनमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

'2 Minutes 25 Seconds'चा हा व्हिडीओ 470 कोटी लोकांनी पाहिला; व्हिडिओत नेमकं आहे तरी काय?

Marathi News Live Updates : नागपुरात ठाकरे गट आक्रमक! बाळासाहेबांच्या फोटो विटंबनेविरोधात निषेध

SCROLL FOR NEXT