29 unauthorized godowns demolished in Bibwewadi
29 unauthorized godowns demolished in Bibwewadi sakal
पुणे

Encroachment Crime : बिबवेवाडीतील २९ अनधिकृत गोदामे पाडली

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरात मोकळ्या जागांवर अनधिकृतपणे गोदामे उभारले जात आहेत. आज बिबवेवाडी भागातील २९ गोदामांवर कारवाई करून हे अवैध बांधकाम पाडून टाकण्यात आले.

शहराच्या उपनगरांमध्ये महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता मोठेच्या मोठे पत्र्याचे गोदामे उभारले जात आहेत. व्यापाऱ्यांना त्यांचा माल ठेवण्यासह अन्य कारणांसाठी याचा वापर होत आहे. पण याठिकाणी सुरक्षेची पुरेशी काळजी न घेतल्याने आगी लागत आहेत. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे.

ही गोदामे उभारताना स्थानिक लोकप्रतिनिधींकडून अभय मिळत आहे. महापालिका प्रशासनावर दबाव टाकून कारवाई टाळली जात आहे.

बिबवेवाडीत गंगाधाम चौक ते शत्रुंजय मंदिर (कोंढवा) रस्त्याच्या दोन्ही बाजूने दुतर्फा मागील मोठ्या प्रमाणावर गोदामे आणि शोरूम उभारण्यात आले आहेत. हा परिसर हिलटॉप हिलस्लोप असल्याने तेथे बांधकाम करता येत नाही. पण पुढारी आणि अधिकाऱ्यांशी संगनमत करून येथे बांधकाम झाली आहेत.

या परिसरात शंभर पेक्षा जास्त लहान मोठी गोदामे, दुकाने आहेत. या अनधिकृत बांधकामांवर मिळकतकर विभागाने तीन पट कर आकारणी केली असली तरीही बेकायदा बांधकामांना चाप बसलेला नाही. पण या भागात आगी लागण्याच्या घटना घडल्यानंतर गेल्यावर्षी काही गोदामांवर कारवाई करण्यात आली. परंतु राजकीय हस्तक्षेपामुळे ही कारवाई थांबली होती.

आज महापालिकेने पुन्हा येथे कारवाई करून २९ गोदामे पाडून टाकली. एक जॉ कटर, चार जेसीबी, चार गॅस कटर, महापालिका मनुष्यबळगट एक, दोन पोलिस गट यांचा या कारवाईत समावेश होता, अशी माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली.

शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता युवराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. तसेच या प्रसंगी कार्यकारी अभियंता प्रकाश पवार, उपअभियंता शैलेंद्र काथवटे, शाखा अभियंता उमेश सिद्रुक, वंदना गवारी कनिष्ठ अभियंता, पियुष दिघे, प्रथमेश देशपांडे, परीक्षित डोंगरे, जय ससाने यांनी यात सहभागी घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT