अकरावी सीईटी sakal
पुणे

अकरावी प्रवेशासाठी २९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

इयत्ता अकरावीसाठी प्रवेश प्रक्रियेतंर्गत आतापर्यंत जवळपास २९ हजार ५५६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : इयत्ता अकरावीसाठी प्रवेश प्रक्रियेतंर्गत आतापर्यंत जवळपास २९ हजार ५५६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. अकरावीच्या  पहिल्या नियमित फेरीतंर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी २३ हजार ५७९ विद्यार्थ्यांनी सोमवारपर्यंत प्रवेश निश्चित केला आहे. आता पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मंगळवारपर्यंत (ता.३१) मुदतवाढ दिली आहे.

अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतंर्गत पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी सोमवारपर्यंतची मुदत होती. आता प्रवेशाला एक दिवसाची मुदतवाढ दिली आहे. या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत एकूण २९ हजार ५५६ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. यामध्ये कोट्यांतर्गत जवळपास पाच हजार ९५९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. यात इन-हाऊस कोट्यातंर्गत तीन हजार ८४३, अल्पसंख्याक कोट्यातंर्गत एक हजार ७७१ आणि व्यवस्थापन कोट्यातंर्गत ३४५ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

तर पहिल्या फेरीतंर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी साधारणत: ६० टक्के विद्यार्थ्यांनी (म्हणजेच २३ हजार ५७९) आतापर्यंत प्रवेश निश्चित केला आहे. पहिल्या नियमित फेरीतंर्गत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महाविद्यालयांमधील रिक्त जागांचा तपशील मागविण्यात येणार आहे. हा तपशील संकलित झाल्यानंतर दुसऱ्या नियमित फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

इन्फोबॉक्स :

अकरावी प्रवेशाची आतापर्यंतची आकडेवारी :

कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या : ३०८

प्रवेश क्षमता : १,१०, ७२५

एकूण झालेले प्रवेश : २९, ५५६

रिक्त जागा : ८१, १६९

पहिल्या फेरीतील प्रवेशाची आकडेवारी :

महाविद्यालये लॉट झालेले विद्यार्थ्यांची संख्या : ३८, ७९६

पहिल्या फेरीत झालेले प्रवेश : २३,५७९

महाविद्यालयांनी प्रवेश नाकारलेले विद्यार्थी : १०१

विद्यार्थ्यांनी रद्द केलेले प्रवेश : ६४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT