shivajirao-Bhosale-bank.jpg 
पुणे

पुण्यातील शिवाजीराव भोसले बँकेच्या तीन ब्रांच मॅनेजरला अटक

शरयू काकडे

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेच्या औंध, कोथरुड व वडगाव-शेरी या पुण्यातील तीन शाखांच्या तत्कालीन बँक मॅनेजरला शिक्रापूर पोलिसांनी आज अटक केली. प्रदीप निम्हण, नितीन बाठे व गोरख दोरगे अशी नावे आहेत.

पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष मंगलदास बांदल यांच्यावर दाखल तीन गुन्ह्यांच्या तपासादरम्यान या तिघांनीही बेकायदेशीर मदत केल्याने ही कारवाई करण्यात आली. आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करुन कर्ज मंजुरी केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी दिली.

26 मे रोजी शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये बांदलांविरोधात पहिला गुन्हा दाखल झाला तो दत्तात्रय रावसाहेब मांढरे यांच्या तक्रारीवरुन. दूसरा दाखल झाला तो रवींद्र सातपूते यांच्या तक्रारीवरुन 30 मे रोजी तर 1 जुनला मंदार पवार यांच्या तक्रारीवरुन तिसरा गुन्हा दाखल झाला. यात अनुक्रमे वडगाव शेरी (पुणे) येथील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेत (सन 2007 दरम्यान) तत्कालीन शाखाधिकारी म्हणून गोरख महादेव दोरगे, औंध शाखेत प्रदीप सहदेव निम्हण तर कोथरुड शाखेत नितीन मारुतराव बाठे आदी तिघेजण कार्यरत होते. याच काळात वरील तीनही प्रकरणात कर्जमंजुरी देताना अनियमितता झाल्याचे वरील तीनही प्रकरणातील तपासात निष्पन्न झाले. वरील तिघांनीही आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याचे स्पष्ट झाल्याने शिक्रापूर पोलिसांनी वरील तिघांनाही काल तपासकामी बोलावून त्यांना अटक केल्याचे शिक्रापूर पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

दरम्यान वरीन तीनही गुन्ह्यांमध्ये बांदलांसह एकूण पाच जण सध्या न्यायालयीन कोठडीत असून वरील तीन बँक अधिकाऱ्यांना शिरुर येथील विशेष दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात येणार आहे. वरील तीनही प्रकरणांचा तपास योग्य पध्दतीने सुरू असून पुढील कार्यवाही जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे शेडगे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT