पुणे

पुणे : सासवडमध्ये एका दिवसात सापडले तीन कोरोनाबाधित रुग्ण

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (जि.पुणे) : येथे सासवड शहरातील गावठाणातील एक 70 वर्षीय ज्येष्ठ महिला आणि अगोदर परवाच्या सापडलेल्या सोपाननगरनजीकच्या पाॅझिटिव्ह रुग्णाची 40 वर्षीय पत्नी आज कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचा अहवाल आला. तर माहूर (ता.पुरंदर) गावी मुंबईहून आलेली 32 वर्षीय बाळंतीण महिला पाॅझिटिव्ह निघाल्याने मोठा धक्काच बसला आहे. एका दिवसात तीन रुग्ण येथे सापडले. त्यामुळे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची पुरंदर तालुक्यातील संख्या 21 वर पोचली आहे.

तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी व वैद्यकीय अधीक्षक डाॅ. किरण राऊत यांनी ही माहिती दिली. परवा सासवड, काल बोपगाव.. आज पुन्हा सासवड दोन, माहूर एक; असे लागोपाठ रुग्ण सापडत आहेत. यात उच्चांकी गुरोळी सहा, सासवड पाच हे लक्षवेधक रुग्णांचे आकडे आहेत. तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या काल 18 होती; ती आज सकालीच 21 वर पोचली. यातील 11 रुग्ण केवळ या एका आठवड्यात सापडले. म्हणजे संसर्गाचा वेग येथेही वाढला. ही चिंताजनक बाब प्रशासन व नागरीकांना शिस्त शिकविणारी नक्कीच आहे; असे जाणकारांकडून स्पष्ट झाले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दरम्यान, बोपगावात संबंधित भाग कंटेन्मेंट झोन केला आहे. कुटुंबिय व संपर्कातील 18 क्वारंटाइन केले आहेत. सासवड व माहूरलाही ही कार्यवाही लगेच हाती घेण्यात येईल.

पुरंदरमधील एकूण 21 पैकी मुंबई कनेक्शनमधील 13 आणि पुणे कनेक्शनधून 7 रुग्ण येथे सापडले. त्यामुळे या दोन्ही कनेक्शनमधील लोकांबाबत संस्थात्मक किंवा होम क्वारंटाइन बाबत गांभीर्यपूर्वक विचार न केल्यास बारामतीप्रमाणे 'कोरोनामुक्त पुरंदर तालुका' शक्यच होणार नसल्याचे स्पष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT