महावितरण विजजोडणी sakal
पुणे

नारायणगाव विभागात महावितरणाचे ३ कोटी ४७ लाख रुपयांची थकबाकी

तीनशे वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित.

रविंद्र पाटे

नारायणगाव: महावितरणच्या नारायणगाव कार्यालया अंतर्गत घरगुती विज ग्राहकांकडे ३ कोटी ४७ लाख रुपयांची तर व कृषी पंपधारक ग्राहकांकडे ११० कोटी रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करून देखील थकबाकीचा भरणा होत नसल्याने महावितरण कंपनीने तीनशे थकबाकीदार घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला असून वसूली मोहिम तीव्र केली आहे.

या बाबत महावितरणचे उपकार्यकरी अभियंता सिद्धार्थ सोनवणे म्हणाले नारायणगाव कार्यालया अंतर्गत नारायणगाव शहर, ग्रामीण, निमगावसावा, पिंपळवंडी, बोरी या भागात ११ हजार ८३९ ग्राहक आहेत. बहुतेक ग्राहकांकडे मागील दोन वर्षांची थकबाकी आहे. महावितरणचे कर्मचारी थकबाकीदार असलेल्या ग्राहकांच्या घरी जाऊन थकबाकीची माहिती देत आहेत. थकबाकी भरण्यासाठी मुदत दिली जात आहे. घरगुती ग्राहकांना थकबाकीची किमान सत्तरटक्के रक्कम भरण्याची विनंती केली जात आहे.

मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहिम सुरू केली आहे. नारायणगाव कार्यालया अंतर्गत २० हजार ९०० कृषी पंपधारक शेतकरी ग्राहकांकडे ११० कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकबाकीदार कृषी पंपधारक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने कृषी धोरण २०२० ही योजना जाहीर केली आहे. या योजने अंतर्गत थकीत वीज बिलात पन्नास टक्के सवलत दिली जात आहे. या योजने अंतर्गत आज अखेर ६ कोटी ५० लाख रुपयांची वसुली झाली आहे.महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. वीज ग्राहकांनी थकबाकी भरून सहकार्य करावे. असे आवाहन सोनवणे यांनी केले आहे.

"कोरोना काळात मागील दोन वर्षापासून घरगुती ग्राहकांना वीज बिल वेळेत मिळाली नाहीत. मीटर रिडींग न घेताच अंदाजे वीज बिले पाठवली आहेत. वीज कंपनीच्या गलथान कारभारामुळे थकबाकी वाढली आहे. दोन वर्षा नंतर अनेक घरगुती ग्राहकांना लाखो रुपयांची वीज बिले आली आहेत. यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे."- मकरंद पाटे( जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना):

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT