Sharad Mohol  Sakal
पुणे

Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ

कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खून प्रकरणातील आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने पुणे पोलिसांना ३० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदत मिळावी, यासाठी पोलिसांनी अर्ज केला होता.

सकाळ वृत्तसेवा

Pune News : कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या खून प्रकरणातील आरोपीवर दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने पुणे पोलिसांना ३० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची मुदत मिळावी, यासाठी पोलिसांनी अर्ज केला होता.

मोहोळचा पाच जानेवारीला कोथरूडमधील सुतारदरा परिसरात गोळ्या घालून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यात १६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

मुख्य सूत्रधार गणेश मारणे आणि विठ्ठल शेलार हे असून साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले,

ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, विठ्ठल शेलार, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे आणि संतोष दामोदर कुरपे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहेत. सर्व आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

यातील गणेश मारणे वगळता इतर १५ आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी ९० दिवसांची वाढ मिळाली यासाठी पुणे पोलिसांनी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने पुणे पोलिसांना दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ दिली आली आहे.

उर्वरित ६० दिवसांची मुदतवाढ मिळावी यासाठी पुणे पोलिसांच्यावतीने मोक्का विशेष न्यायालयात अर्ज करण्यात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे करत आहेत.

का मिळाली मुदतवाढ?

मोक्कानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपींची ३० दिवसांची पोलिस कोठडी पोलिसांना मागता येते. इतर गुन्ह्यात हा कालावधी १४ दिवसांचा असतो. तसेच मोक्का कायद्यानुसार गुन्हा दाखल असेल तर न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यासाठी १८० दिवसांची मुदत मिळते. त्यातील ९० दिवस संपण्यापूर्वी मुदतवाढीचा अर्ज करणे गरजेचे असते. त्यानुसार पोलिसांनी अर्ज केल्याने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET UG Result पेपरफुटीनंतर गुणांचा महाघोटाळा, अन्सर की अन् स्कोअरकार्डवर वेगवेगळे गुण; बीडच्या 2 विद्यार्थ्यांचा आक्षेप

Bank Holiday: 20 ते 26 जुलैदरम्यान 'या' दिवशी बँका राहणार बंद; बँकेत जाण्याआधी पाहा RBIची यादी

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मुंबईत CJP चे आंदोलन, कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

Tukaram Mundhe यांच्या धाडीनंतर अकोल्यातील गुटखा कारवाईत मोठा ट्विस्ट, काय घडलं?

Corona Virus: कोरोना परत येतोय? महाराष्ट्रात ४८ जणांना लागण; धक्कादायक माहिती समोर

SCROLL FOR NEXT