pune  sakal
पुणे

जात प्रमाणपत्र देण्यास ३० दिवसांची मुदतवाढ

जातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीच्या प्रमाणपत्राअभावी अकरावी प्रवेशासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे त्यांना जातीचे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ३० दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

मुंबई महानगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिकांच्या कार्यक्षेत्रात अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यासाठी विविध कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. दाखल्याअभावी अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशास अडचणी येत आहेत. त्या अनुषंगाने शिक्षण संचालनालयाने गेल्या ३० ऑगस्ट रोजी निर्देश जारी केलेआहेत.विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्रासाठी प्रस्ताव दाखल केला आहे.

प्रस्तावाची पोच आणि सोबत वडिलांचे जात प्रमाणपत्र सादर केल्यास ते प्रवेशासाठी पात्र असतील. ज्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र आणि प्रस्तावाची पोचही नाही, त्यांनी वडिलांचे जातीचे प्रमाणपत्र आणि हमीपत्र दिल्यास ते मागास प्रवर्गातून प्रवेशासाठी पात्र राहतील. परंतु, या अटींवर प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांना ३० दिवसांत स्वत:चे जात प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील; अन्यथा त्यांचे प्रवेश रद्द होतील.व्हीजेएनटी, ओबीसी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रासोबत उन्नत व प्रगत वर्गात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी हमीपत्र घेऊन ३० दिवसांची मुदत देण्याबाबत यापूर्वी संकेतस्थळावर दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT