Pune University Sakal
पुणे

अभ्यासक्रमांत ३० टक्के कपात करावी; विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडे मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या द्वितीय सत्र परीक्षेसाठी केवळ बीएस्सीच्या अभ्यासक्रमात ३० टक्के कपात केली आहे. मात्र, अनेक अभ्यासक्रम शिकवणे अद्याप अपूर्ण आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) द्वितीय सत्र परीक्षेसाठी केवळ बीएस्सीच्या अभ्यासक्रमात (Syllabus) ३० टक्के कपात (Reduction) केली आहे. मात्र, अनेक अभ्यासक्रम शिकवणे अद्याप अपूर्ण आहे. तसेच ऑनलाइन शिक्षण (Online Education) समजण्यात अनेक अडचणी आल्या आहेत. त्यामुळे सर्व अभ्यासक्रमांत ३० टक्के कपात करून ७० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून (Student) होत आहे. (30 Percent Reduction in Syllabus Demand of Students to the University)

‘सकाळ’ने विद्यापीठाच्या द्वितीय सत्र परीक्षेसाठी पूर्ण अभ्यासक्रम, हे वृत्त नुकतेच प्रसिद्ध केले. विद्यापीठाने या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. विद्यापीठाच्या द्वितीय सत्राच्या परीक्षा ऑनलाइन होणार आहे. विज्ञान शाखा वगळता इतर शाखांचा या परीक्षेसाठी १०० टक्के अभ्यासक्रम असणार आहे.

महाविद्यालये बंद असल्याने अनेक महाविद्यालयात अभ्यासक्रम शिकवून झालेला नाही. असे असताना पूर्ण अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्याचा निर्णय कसा घेण्यात आला, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. यामुळे सर्व शाखांच्या परीक्षा ७० टक्के अभ्यासक्रमावर घेण्याची मागणी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, डॉ. अंजली कुरने, डॉ. पराग काळकर, डॉ. संजीव सोनवणे यांच्याकडे केली असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांनी सांगितले. एमएससी, इंजिनिअरिंग, एमबीए, यासह अनेक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर अभ्यासक्रम कपात करावी, अशी मागणी केली आहे. युक्रांदचे उपाध्यक्ष कमलाकर शेटे म्हणाले, ‘‘अनेक महाविद्यालयांनी अभ्यासक्रम पूर्ण शिकवलेला नाही. जेवढा अभ्यासक्रम शिकवला आहे, त्यावर परीक्षा घेतली जावी’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालकांनो लक्ष द्या! पुण्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल, महापालिकेकडून परिपत्रक जारी, पण कारण काय?

RBI Report: रिझर्व्ह बँकेच्या अहवालात नागरी सहकारी बँका भक्कम; मालमत्ता गुणवत्ता सुधारली

नारायण आठवले, गोवा, ढसाळ आणि पत्रकारितेचा एक फ्लॅशबॅक

Pune News: राज्यातील लाखो गृहनिर्माण संस्थांना दिलासा मिळणार?; महासंघाच्या सात महत्त्वाच्या मागण्या शासनाकडे

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT