30 percentage hotel business in Pune Pimpri-Chinchwad still closed 
पुणे

30 टक्के हॉटेल व्यवसाय अजूनही बंदच! पुणे, पिंपरी-चिंचवडमधील स्थिती

सकाळवृत्तसेवा

पुणे : अनलॉकनंतर नऊ महिन्यांनी सुरू झालेला शहरातील हॉटेल व्यवसाय अद्यापही पूर्ण क्षमेतेने सुरू झालेला नाही. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील सुमारे ३० टक्के हॉटेल्स अद्याप बंद आहेत. त्यामुळे येथील आर्थिक उलाढाल अजूनही रुळावर आली नसून अनेकांचा रोजगार कायमचा बुडाला आहे.

पुरेशा प्रमाणात व्यवसाय होईल की नाही या भीतीनेच अनेक व्यावसायिकांनी पार्सलची सुविधा सुरू केली नव्हती. पूर्ण क्षमेतेने परवानगी मिळाल्यानंतरच हॉटेल सुरू करू या भावनेतून त्यांनी थांबण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गेल्यावर्षी सुमारे नऊ महिने ७० टक्के व्यवसाय पूर्णतः थांबला होता. तर अपेक्षित उलाढाल होत नसल्याने हॉटेल पुन्हा बंद करण्यात आली होती. या दोन्ही बाबींचा झटका बसल्याने काही हॉटेल अजूनही बंदच आहेत. तर काहींनी आता या व्यवसायत काही खरे राहिले नाही म्हणून दुसरा व्यवसाय सुरू केला आहे.

ही आहेत हॉटेल बंद असल्याची कारणे :
- लॉकडाऊन काळातील आर्थिक नुकसान सोसले नाही
- भांडवल शिल्लक न राहिल्याने पुन्हा हॉटेल सुरू करता येर्इना
- पैसा व सर्व यंत्रणा आहे, पण व्यवसाय होर्इल की नाही याची भीती
- पुन्हा लॉकडाऊन झाले तर अजून नुकसान होर्इल अशी मानसिकता
- कोरोनामुळे बदलेल्या परिस्थितीमुळे नियमितचे ग्राहक मोठ्या प्रमाणात कमी झाले
- दुसरा व्यवसाय सुरू केला

या भागातील हॉटेलांना सर्वाधिक फटका :
घरून काम करण्याची मुभा देण्यात आल्याने शहरातील बाणेर, बालेवाडी, बावधन, औंध, हिंजवडी, खराडी, विमाननगर आणि मगरपट्टा अशा भागातील अनेक आयटी कर्मचारी परतलेच नाहीत. किंवा कामावर हजर झाले असले तरी ते घराजवळील हॉटेलांतच जाण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे आयटी परिसरातील ठराविक हॉलेल्सचा मोठा फटका बसला आहे.

रोजगार कायमचा बंद  :
कोरोनाच्या आधी या क्षेत्रात सुमारे अडीच लाख कामगार कार्यरत होते. मात्र ३० टक्के हॉटेल्स सुरूच झाले नसल्याने तेथे कामाला असलेल्यांचा रोजगारच बुडाला आहे. तसेच अनेक ठिकाणी कर्मचा-यांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सुमारे दोन लाख कामगार कार्यरत आहेत.


''हॉटेल व्यवसाय संध्या प्रचंड बेभरवशाचा झाला आहे. अनेक हॉटेल्स अशी आहेत की ज्यांचा महिन्याचा खर्च देखील भागत नाही एवढाच धंदा होतोय. काही ठिकाणी व्यवसाय आणि जागामालक यांच्यात वाद आहेत. अशा काही कारणांमुळे पुणे व पिंपरी-चिंचवडमधील तीस टक्के व्यवसाय सुरूच झालेला नाही.''
- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट ऍण्ड हॉटेलियर्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: यंदा रेल्वे रुळावर पाणी साचणार नाही, महापालिकेचा मोठा प्लॅन तयार; नेमकी योजना काय?

Fifa World Cup 2026 : स्पेन साखळी फेरीतच घरी जाणार? दुबळ्या केप व्हर्दे संघाने 'बरोबरी'त रोखल्याने माजी विजेत्यांचे समीकरण बिघडले

YouTube Growth Tips: यूट्यूबवर सबस्क्राईबर्स वाढवून महिन्याला लाखो कसे कमवायचे? कंपनीने स्वतःच सांगितली भन्नाट ट्रिक

Latest Marathi News Live Update : अंबरनाथमध्ये गाडीला कट लागल्याच्या रागातून तरुणाला बेदम मारहाण

CM Devendra Fadnavis : महिन्याभरात राज्यात लोकायुक्त कायदा लागू करणार

SCROLL FOR NEXT